शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांपाठोपाठ शिकारीही जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:28 IST

तुकाराम हरी वीर असे शिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून ठासणीची बंदूक आणि बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत.

डोंबिवली : कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने १९ एप्रिलला गुरुवारी सापळा लावून वन्यप्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला जेरबंद केले होते. याच प्रकरणात कसोशीने तपास करून बिबट्याची शिकार करणारा आणि वाघसदृश कातडे विक्रीसाठी देणारा, अशा आणखी दोघांना अटक केली आहे.तुकाराम हरी वीर असे शिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून ठासणीची बंदूक आणि बिबट्याची नखे जप्त करण्यात आली आहेत. तर, अनिल दत्तू घोलप असे वाघसदृश कातडे विक्रीसाठी देणाºया आरोपीचे नाव आहे. तर, १९ एप्रिलला बदलापूर पाइपलाइन रोड, कोळेगाव परिसरात वन्यप्राण्यांच्या कातड्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या विशाल धनराज आणि सचिन म्हात्रे यांना कल्याण गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने अटक केली होती. बिबट्या व वाघसदृश कातडे त्यांच्याकडून हस्तगत केले होते.तस्करांनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तुकाराम वीर याला तो राहत असलेल्या खालापूर तालुक्यातील आंबेवाडी वावरले या गावातून अटक केली. तर, अनिल घोलप हा मीरा रोडला शांतीनगर परिसरात राहणारा आहे. तो वाघाच्या कातडीचा तस्कर आहे. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी कल्याण सत्र न्यायालयाने सुनावली आहे.जनावरे मारल्याने कृत्यतुकाराम राहत असलेल्या खोंडा जंगलामध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यातील एका बिबट्याने दोन महिन्यांपूर्वी तुकारामच्या ३० शेळ्या, एक गाय, एक बैल मारले होते. आपल्या जनावरांचे नुकसान झाल्यामुळे चिडलेल्या तुकारामने याच बिबट्याला ठासणीच्या बंदुकीतून गोळी झाडून ठार मारल्याचे त्याने चौकशीत कबूल केले.जनावरे बिबट्याने मारल्यानंतर वनविभागाकडे तक्रार केली होती. परंतु, त्याच्या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचे तुकारामचे म्हणणे आहे. त्याच्याकडे असलेली बंदूक बेकायदा असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

टॅग्स :thaneठाणे