शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

पहिल्या टप्यात ६ लाख ६० हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:58 IST

CoronaVaccine thane: कोरोनाच्या नवीन विषाणूने देशात दस्तक दिली असली तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरु वात होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : कोरोनाची लस आता नव्या वर्षात येणार असल्याने त्याचे नियोजन करण्यासाठी महापलिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार आरोग्य सेवेतील अत्यावश्यक सेवेतील ठाण्यातील सुमारे ६ लाख ६० हजार लाभाथ्र्याची यादी पालिका प्रशासनाने तयार केली असून १३२ दिवसांमध्ये लसीकरणाचे दोन्ही टप्पे पार करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. आवश्यक लसींचा साठा वेळेत उपलब्ध झाल्यास चार महिन्यात १३ लाख २० हजार लसीकरणाचे टार्गेट पूर्ण होईल असा दावा पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

               कोरोनाच्या नवीन विषाणूने देशात दस्तक दिली असली तरी कोणत्याही क्षणी संपूर्ण देशात ‘को-वीन’ मोहिमेला सुरु वात होण्याची शक्यता आहे. या मोहिमेतंर्गत सुरु वातील  एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लाभाथ्र्याचे दोनवेळा लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार देशात ३३ कोटी, महाराष्ट्रात ५१ लाख तर ठाणो पालिका हद्दीत ६ लाख ६० हजार लाभाथ्र्याना कोविड प्रतिबंधक लस देण्याची योजना आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणो पालिकेने त्यासाठी आपली संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. लसीकरणासाठी मुबलक जागा असलेल्या २० आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली असून त्यासाठी १०० जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पथक दिवसाला ५०० लस देणार आहे. म्हणजे ठाण्यात रोज १० हजार आणि आठवड्याला ७० हजार लाभाथ्र्याचे लसीकरण होणार आहे.

 सर्वप्रथम आरोग्य सेवकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्या ६ लाख ६० हजार लाभाथ्र्याची यादी तयार आहे.  पण लसींचा मुबलक साठा आल्यास १ लाख ८० हजार फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात येईल. फ्रन्टलाईनमध्ये आयुक्तांपासून ते शासकीय, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांर्पयत प्रत्यक्ष फिल्डवर असलेल्यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

 ६ लाख ६०  हजार लाभाथ्र्याचे दोनवेळा लसीकरण होणार आहे. म्हणजे १३ लाख २० हजार लसीकरणाचे मोठे आव्हान आहे. त्यातही एकाही लाभाथ्र्याचे दुस:या टप्प्यातील लसीकरण चुकता कामा नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोणाला मिळणार पहिल्या टप्यात लस आरोग्य सेवक- ६०, ०००फ्रन्टलाईन वर्कर्स - १,८०,००५० ते ६० वयोगट- ६४,८००६० वर्षापुढील- ४३,२००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या