शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वाइन शॉपमध्ये घुसून गोळीबार

By admin | Updated: April 27, 2017 23:56 IST

भर दुपारी उल्हासनगरच्या मुकेश वाईनमध्ये घुसून पुजारीच्या दोन हस्तकांनी गोळीबार केला. या घटनेमुळे व्यापारी

उल्हासनगर : भर दुपारी उल्हासनगरच्या मुकेश वाईनमध्ये घुसून पुजारीच्या दोन हस्तकांनी गोळीबार केला. या घटनेमुळे व्यापारी, राजकीय नेत्यात भीतीचे वातावरण पसरले असून गुंड सुरेश पुजारीच्या मुसक्या आवळण्याची मागणी सुरू झाली आहे. पुजारी टोळीने यापूर्वी केबल व्यापारी सच्चिदानंद कारिरा यांची हत्या केली होती. या प्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकांनी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतरही उल्हासनगरातील नामांकित व्यक्तींना फोन करून खंडणीचे धमकीसत्र गुंड सुरेश पुजारी याने सुरूच ठेवल्याचे या गोळीबाराने उघड झाले. कॅम्प पाचच्या परिसरात विजय रंगलानी यांचे मुकेश वाईन शॉप आहे. दुपारी एकच्या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी तरूणांनी वाईन शॉपमध्ये प्रवेश केला. काऊंटरवरील मॅनेजरला काही एक न बोलता त्यांनी लिफाफा दिला आणि गोळीबार केला. काही समजण्याच्या आत ते पळून गेले. गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मॅनेजरला दिलेल्या लिफाफ्यावर आणि आतील कागदावरही सुरेश पुजारी लिहिले होते. मुकेश वाईनचे मालक विजय रंगलानी आहेत. पण मला एकदाही सुरेश पुजारीचा फोन आला नव्हता, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनीही त्याचीच री ओढली. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मोहन वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमऱ्याचे चित्रीकरण ताब्यात घेऊन तपास सुरू केला. गुन्हे अन्वेषण विभागही तपास करीत आहे. मुकेश वाईनमधील गोळीबारप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात सुरेश पुजारीसह दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांनी दिली. (प्रतिनिधी)