शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा महिला अध्यक्षांच्या नातेवाईकाकडून मिरवणुकीत नाचताना हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:44 IST

अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांच्या नातेवाईकाने देवीच्या विसर्जन मिरवणूकीत नाचतांना हवेत दोन वेळा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. स्वत: सुजाता भाईर यांच्या फेसबुक अकाऊंटमध्ये हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर यांच्या नातेवाईकाने देवीच्या विसर्जन मिरवणूकीत नाचतांना हवेत दोन वेळा गोळीबार केल्याचे समोर आले आहे. स्वत: सुजाता भाईर यांच्या फेसबुक अकाऊंटमध्ये हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. गोळीबार करणारा व्यक्ती हा भोईर यांच्या जवळचा नातेवाईक असुन त्यांच्या समोरच हा गोळीबार करण्यात आला आहे. अंबरनाथ भाजपा शहर महिला अध्यक्षा सुजाता भोईर आणि त्यांचे नातेवाईक एका मिरवणूकत नाचतांनाचा व्हिडीओ फेसबुकवर वायरल झाला आहे. हा व्हिडीओ 1 ऑक्टोंबरचा असुन सायंकाळी देवीच्या विसर्जन मिरवणूकीत नाचतांना हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. नाचतांना हवेत फायरिंग करतांनाचा व्हिडीओ भोईर यांनी आपल्याच कार्यकत्र्याना काढण्यास सांगितले होते. येवढेच नव्हे तर हा व्हिडीओ लागलीच फेसबुकवर लोड देखील करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये दिसणारा तरुण हा आशिष भोईर नामक व्यक्ती असुन तो सुजाता भोईर यांना जवळचाच नातेवाईक आहे. हा सर्व प्रकार सुजाता भोईर यांच्या समोर घडलेला असतांनाही तो प्रकार रोखण्याचा कोणताच प्रयत्न  त्यांच्या मार्फत झालेला नाही. उलय या फायरिंगचा आनंद घेत जास्त जोमात नाचण्याचेच काम येथे करण्यात आले. चार महिन्यांपूर्वीच अंबरनाथच्या गायकवाड पाडा येथे नाचतांना तरुणांनी चालविलेल्या बंदुकीतुन सुटलेली गोळी समोर बसलेल्या एका 13 वर्षीय मुलाला लागुन त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका बडय़ा राजकीय पुढा-याच्या दोन्ही मुलांना देखील अटक झाली होती. असे असतांना देखील देवीच्या मिरवणूकीत भर गर्दीत पुन्हा गोळीबार घडल्याने पोलीसांचा धाक राहिलेला नाही हे उघड झाले आहे. या संदर्भात पोलीसांकडुन माहिती घेतली असता आशिष भोईर यांना बंदुकीचा परवाना देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या बंदुकीतुन ही फायरिंग झाली आहे ती बंदुक परवानाधारक असल्याचे समोर येत आहे. मात्र परवानाधारक बंदुकीतुन हवेत गोळीबार करण्याचा किंवा सण,उत्सव किंवा लगअसमारंभात फायरिंग करणो हा गुन्हा आहे. हा गुन्हा घडत असलेला व्हिडीओ भाजपा महिला अध्यक्ष स्वत:च्या फेसबुक अकाऊंटमध्ये लोड करित असल्याने भाजपा महिला अध्यक्षा अडचणीय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या संदर्भात महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात बोलण्यास टाळले. 

 ह्याया व्हिडीओ पाहुन संबंधीत गोळीबार करणा-या व्यक्तीवरची चौकशी केली जाईल. त्याच्याकडील लायसन्स याची देखील तपासणी करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणो हे बेकायदेशिर असुन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.- अंकित गोयल, पोलीस उपायुक्त