शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली पश्चिमेतील अग्निशमन केंद्र दुर्लक्षित

By admin | Updated: May 11, 2017 01:49 IST

आधारवाडीतील अग्निशमन दलाच्या केंद्राच्या दुरवस्थेकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच, आता डोंबिवलीतील ‘ह’ प्रभागातील

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आधारवाडीतील अग्निशमन दलाच्या केंद्राच्या दुरवस्थेकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच, आता डोंबिवलीतील ‘ह’ प्रभागातील अग्निशमन केंद्राचे नादुरुस्त प्रवेशद्वार दुरुस्त करण्याकडे कानाडोळा केला जात आहे. नादुरुस्त प्रवेशद्वार अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी अडचणीचे ठरत आहे. ही वाहने आतबाहेर नेता येत नसून त्यात सुरक्षारक्षकांची दमछाक होत आहे.आधारवाडी अग्निशमन दलाच्या कें द्राच्या दुरवस्थेचा मुद्दा वारंवार स्थायी समितीच्या सभेत उपस्थित झाला आहे. परंतु, यावर ठोस कृती अद्यापही झालेली नाही. महापालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये हे केंद्र धोकादायक असल्याचेही समोर आले आहे. मात्र, आजवर योग्य कार्यवाही झालेली नाही. याचप्रमाणे डोंबिवली पश्चिमेतील केंद्रही दुर्लक्षित झाले आहे. या अग्निशमन केंद्रासमोरील प्रवेशद्वार नादुरुस्त झाले आहे. ते उघडणे आणि बंद करणे जिकिरीचे झाले आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर या केंद्राची निर्मिती झाली. कार्यालयातील पार्किंगची जागा केंद्राला वापरण्यास देण्यात आली. परंतु, ती अपुरी पडत असल्याने कें द्रातील जवानांना आपत्कालीन प्रसंगासाठी आवश्यक असलेल्या साधनसाम्रगींची पेटारे बाहेरच ठेवावी लागत आहेत. त्यात समोरील प्रवेशद्वार बिघडल्याने हे सामान चोरीला जाण्याचीही शक्यता आहे. ‘ह’ प्रभाग कार्यालयातील बहुतांश प्रवेशद्वारे ही नादुरुस्त असल्याने प्रभाग अधिकारी शरद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारीही केल्या आहेत. मात्र, ते कोणतीच ठोस कार्यवाही करत नसल्याने सुरक्षा राखायची तरी कशी, असा प्रश्न येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना पडला आहे. या अग्निशमन केंद्रात सध्या दोन बंब आहेत. आपत्कालीन प्रसंग, घटनांचा कॉल आल्यावर नादुरुस्त प्रवेशद्वारामुळे बंब बाहेर काढताना जवानांची चांगलीच कसरत होत आहे.