शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बसगाड्यांना लागणाऱ्या आगीला प्रशासनच जबाबदार

By admin | Updated: August 11, 2016 03:58 IST

केडीएमटीच्या बसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी केला

कल्याण : केडीएमटीच्या बसना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप परिवहन सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अहवाल सादर करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.गणेशघाट आगारातून बाहेर पडलेल्या बसला २९ जुलैला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी कल्याण बस आगारात केडीएमटीच्या आणखीन एका बसला आग लागल्याची घटना घडली. चालक आणि वाहकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने आगीचे प्रमाण फारसे वाढले नाही. इंजीनच्या वायरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनांना कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी परिवहन सदस्यांच्या वतीने परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे आणि आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली. आग लागलेल्या दोन्ही बस आयशर कंपनीच्या आहेत. वारंवार घडलेल्या घटना पाहता कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या सर्व घटनांना तत्कालीन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप सभापती चौधरी यांनी केला आहे. या कंपनीच्या २० बसेस उपक्रमाकडे आहेत. बस खरेदीआधी २ सप्टेंबर २०१३ रोजी इंदौर येथे या बसेस पाहणी करण्यासाठी परिवहनचे सदस्य गेले होते. त्या बाहेरून योग्य वाटत असल्या तरी उपक्रमात दाखल होण्याआधी त्याचे स्ट्रक्चर बॉडी इनस्पेक्शन सदस्यांच्या समक्ष होणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात तत्कालीन महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांना पत्रही पाठविले होते. परंतु त्याची दखल न घेता त्या बस सेवेत दाखल केल्याने आजची परिस्थिती उदभवली आहे.