शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उपस्थितांच्या बंधनामुळे मंगल कार्यालयांवर आर्थिक विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST

ठाणे : लग्नसराईच्या दिवसांत पुन्हा एकदा लॉकडाऊनचे विघ्न येण्याची शक्यता निर्माण झाल्याने विवाह, मुंजी, साखरपुडे आदी समारंभांकरिता हॉलची व्यवस्था ...

ठाणे : लग्नसराईच्या दिवसांत पुन्हा एकदा लॉकडाऊनचे विघ्न येण्याची शक्यता निर्माण झाल्याने विवाह, मुंजी, साखरपुडे आदी समारंभांकरिता हॉलची व्यवस्था करणाऱ्या मालकवर्गामध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांत सर्व सुरळीत झाल्याने व लोकल सुरू असल्याने विवाहसोहळे धूमधडाक्यात सुरू झाले होते. त्यामुळे खोळंबलेल्या विवाहांच्या बुकिंगने हॉलमालक सुखावले होते. मात्र, अचानक कोरोना वाढू लागल्याने ज्यांनी हॉल बुक केलेत त्यांनी केवळ १०० पाहुण्यांनाच निमंत्रित करण्याचे आवाहन मालकवर्गाने केले आहे. अनेक घरांत वधू-वरांचे कुटुंबीय अगोदरच शेकडो पत्रिका वाटून मोकळे झाले असल्याने आता पाहुण्यांना तुम्ही येऊ नका, असे कसे सांगायचे, हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काहींनी बुकिंग रद्द करण्याचा विचार केला आहे, तर काहींनी बोहल्यावर चढण्याचा बेत पुढे ढकलला असल्याने पुन्हा आलेल्या निर्बंधांमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची भावना हॉलमालकांनी व्यक्त केली.

कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने सार्वजनिक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पुन्हा एकदा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मास्क वापरा, गर्दी टाळा; अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिला. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का, याची यंत्रणेकडून तपासणी होणार आहे. ज्यांनी विवाहसाठी हॉलचे आगाऊ बुकिंग केले आहे, त्यांच्याशी संपर्क साधून हॉलमालक, व्यवस्थापक विवाहसोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांची यादी अगोदर देण्याचे आवाहन करीत आहेत. काहींनी पाहुण्यांच्या नोंदी, संपर्क क्रमाकांसोबत मागितल्या आहेत, तसेच तापमान तपासणे, दोन खुर्च्यांमधील अंतर आणि प्रत्येकाने मास्क घातला की नाही, यावर लक्ष ठेवण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करणार आहेत. कुठल्या सोहळ्याला किती पाहुणे जेवले, त्या प्रत्येक पानावर हॉलचा नफा अवलंबून असतो. माणसेच कमी बोलवायची बंधने लागू केल्याने हॉलचा नफा झपाट्याने घसरला आहे. पाहुण्यांची संख्या कमी झाल्याने कर्मचारीदेखील कमी केले असल्याचे हॉलमालकांनी सांगितले.

----------------

सरकारने आखून दिलेले सर्व नियन आम्ही पाळत आहोत. उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आल्याने लग्नसोहळे रद्द होतील की नाही, हे येत्या आठ ते दहा दिवसांत समजेल.

-रोहितभाई शहा

..............

आम्ही लग्नसोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या १०० जणांची यादी मागवली आहे, तसेच खुर्च्यांप्रमाणे जेवणाच्या काउंटरमध्येही अंतर ठेवले जात आहे. सरकारचे नियम सततच बदलत असल्याने लाखोंचे नुकसान होत आहे.

-विनोद शिंदे

..........

५० च्या वर पाहुणे हॉलमध्ये आणायचे नाहीत, असे आम्ही फोन करून सांगितले आहे. जेवणाच्या व्यवस्थेत बदल झाला असून, उपस्थितांनी स्वतः जाऊन जेवण न घेता आमचे कर्मचारी स्वतः जेवण वाढणार. ते स्वतः हँडग्लोव्हज, डोक्यावर कॅप, तसेच मास्क घालून असतील.

-सुनील कर्णिक

..........

हॉल बुक करायला येणाऱ्यांकडून आम्ही अर्ज भरून घेतो. त्यात सरकारच्या नियमांचे पालन करू आणि त्यावर सही घेतली जाते. कार्यक्रमाच्या आधी आणि समारंभ झाल्यावर हॉल सॅनिटाइज करून घेतो.

-प्रशांत हजारे

........

वाचली