शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात, पालिकेने हटविली निविदेतील 'ती' अट!

By अजित मांडके | Updated: April 24, 2024 15:19 IST

दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावी यासाठी महापालिकेने यंदा आधीच पावले उचलली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथील केल्या. अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.        ठाणे महापलिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक २०१ नाले असून त्याखालोखाल दिव्यात १३१, नौपाडा प्रभाग समितीत ४९, वागळे इस्टेटमध्ये ३८, लोकमान्य-सावरकरात ३४, उथळसमध्ये ३४, वर्तकनगरात २९, माजीवाडा- मानपाडा ४४, मुंब्रयात ८० नाले असल्याची नोंद आहे. यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यामुळे पालिकेने मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांच्या नऊ प्रभाग समितीनिहाय निविदा काढल्या होत्या. 

महापालिकेने टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. तसेच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात केली होती. त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजविली होती. त्यामुळे पालिकेने वारंवार निविदेला मुदतवाढ दिली. त्यानंतर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर याठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ देत २२ एप्रिल पर्यंत वाढविली होती. ही मुदतवाढ देत असतांना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथील करण्यात आली. ही अट शिथिल करण्यात आल्याने अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळाले आहेत. त्यानुसार आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका