शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ४५०७ इमारतींचा पुनर्विकास टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:16 IST

टीडीआरचा अडथळा दूर; नगरविकासचा निर्णय

ठाणे : राज्याच्या नगर विकास विभागाने आमदार संजय केळकर यांच्या मागणीची दखल घेऊन धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान स्लम टीडीआर वापरण्याचे बंधन रद्द केले आहे. याबाबतची सूचना नगरविकास खात्याने काढली आहे. ठाण्यातील अधिकृत ४५०७ धोकादायक इमारतींचे पुनर्वसन राज्य सरकारच्या स्लम टीडीआरच्या वापरण्याचा बंधनाने अडचणीत आले होते. त्यांच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.पुनर्विकासासाठी तब्बल २० टक्के स्लम टीडीआर वापरण्याची अट होती. हे व्यवहारिक नव्हते. महापालिका हद्दीत नवीन स्लम टीडीआर निर्माण होत नाही. स्लम टीडीआरची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे. ती वाढती आहे तो उपलब्ध नसल्याने असलेल्या स्लम टीडीआरची विक्री चढ्या भावाने होते. त्यामुळे तो विकत घेणे हे पुनर्विकासाचे काम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना परवडणारे नाही. या बंधनाने धोकादायक अधिकृत इमारतींचा विकास रखडला आहे. बांधकाम व्यवसायिक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ठाण्यातील ४५०७ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर टीडीआरची बंधनकारक अट रद्द व्हावी, यासाठी केळकर यांनी पाठपुरावा केला होता. तर ठाण्यातील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या राहिवाशांचे प्रातिनिधिक शिष्टमंडळही त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात गेले होते. आता स्लम टीडीआर वापरण्याचे बंधन नगरविकास खात्याने रद्द केले आहे.काय म्हटले आहे पत्रात?नगरविकास विभागाने पाठवलेल्या पत्रात ठाणे महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टींचा हस्तातरणीय विकास हक्क निर्माण किंवा मिळत नसल्यास त्याऐवजी नियमित हस्तांतरणीय विकास हक्क वापरता येईल, असे नमूद केले आहे.