शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गोकूळनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:19 IST

कित्येक वर्षे गोकूळनगर येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा मार्ग अडकून पडला होता. परंतु, निवडणुकीच्या माध्यमातून घेतलेल्या कौलात

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कित्येक वर्षे गोकूळनगर येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा मार्ग अडकून पडला होता. परंतु, निवडणुकीच्या माध्यमातून घेतलेल्या कौलात या परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गोकूळनगर येथील झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवणाऱ्या पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटी लि.च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील आई जरीमरीदेवी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे. निवडणुकीत सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसंग्राम या अभद्र युतीच्या जनसेवा विकास पॅनलला रहिवाशांनी जबरदस्त दणका दिला आहे. गोकूळनगर येथील पाच एकरवर झोपडपट्टी वसलेली आहे. तिचा पुनर्विकास होण्यासाठी येथील रहिवाशांनी एकत्र येऊन २००६ साली पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटीची स्थापना केली आहे. या सोसायटीचे नेतृत्व स्थानिक नगरसेविका स्व. शारदा पाटील यांनी केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील ते करीत आहेत. पाटील यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पाला सीसी मिळवून दिली. ठामपाच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर येथील विरोधी पक्षांनी वातावरण गढूळ करून पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटीच्या निवडणुकीत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी विकासाला मत दिल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. पवनसुत को-आॅप. हाउसिंग सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक शासनाच्या निवडणूक प्राधिकरणाद्वारे रविवारी वर्धमान हॉल, गोकूळनगर येथे झाली. या निवडणुकीत एकूण ६८१ पैकी ५३८ सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. सर्वसाधारण मतदारसंघासाठी १४ सदस्य, महिला राखीव मतदारसंघासाठी २ सदस्य, इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघ १, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागासवर्ग राखीव मतदारसंघ, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघासाठी १ सदस्याची निवडणूक झाली. - १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आई जरीमरीदेवी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय संपादन केला. उपनिबंधक अजित सासवडे यांच्या आदेशाने एसआरए अधिकारी सुनील शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.