शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उल्हासनगर एमजेपीच्या जागेवर नामफलक; कोट्यावधीच्या जागेवर सनद काढल्याची अफवा 

By सदानंद नाईक | Updated: September 17, 2023 15:52 IST

उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कँम्प, शिवमंदिर मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे खुली जागा व त्यावर पडलेल्या अवस्थेत निवासस्थान आहेत

उल्हासनगर : शहर पूर्वेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निवासस्थान व खुल्या जागेवरील नामफलक काढुन टाकून त्याजागी गेल्या काही वर्षापासून भूमाफिया भरणी करीत होते. जागृत नागरिकांच्या सतर्कतेमुळे एमजीपीने खुल्या जागेवर नामफलक लावले असून कोट्यवधींचा भूखंड हडप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कँम्प, शिवमंदिर मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे खुली जागा व त्यावर पडलेल्या अवस्थेत निवासस्थान आहेत. या मोक्याच्या ठिकाणच्या जागेची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याने, भूमाफियांच्या जागेवर डोळा आहे. या भुखंडावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीचा भुखंड असा फलक होता. मात्र कालांतराने तो फलक गायब होऊन त्याजागेवर भरणी करण्यात आली. यामुळे खड्ड्याच्या स्वरूपात असलेल्या या भुखंडाची जागा रस्त्याच्या समान पातळीवर आली. खुल्या जागेवर टाकण्यात आलेला कचरा व डेब्रिज रस्त्यावर येऊ लागल्याने, भूखंड पुन्हा चर्चेत आला. 

महापालिका व प्रांत कार्यालयाला हाताशी धरून जागेवर सनद काढल्याचे बोलले जात आहे. दरम्यान माजी उपमहापौर विनोद ठाकूर, काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह अन्य जणांनी एमजीपीच्या जागेबाबत आवाज उठविला आहे. मात्र खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तीने डेब्रिजचा भरणा टाकण्याचे काम सुरू ठेवले. राष्ट्रलोक पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि प्रहार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड. स्वप्निल पाटिल यांनी याविषयी आवाज उठवल्यानंतर, अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला जाग येऊन, त्यांनी जागेवर नामफलक लावला आहे. तसेच त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या आठवड्यात एमजीपी ठाणे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे यांनी याठिकाणी भेट देऊन यावर झालेल्या अतिक्रमणाविरूद्ध आणि बोगस सनद प्रकरणात कारवाईचे संकेत दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जागा महापालिकेला? महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गेल्या वर्षी मालमत्ता विभागाला एक पत्र देऊन शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागा अंतर्गत येणाऱ्या जागा व निवासस्थाने ताब्यात घेण्याचे सुचविले होते. प्राधिकरणाने त्यांच्या ताब्यातील खुली जागा व निवासस्थाने महापालिकेकडे हस्तांतरीत केली. त्याप्रमाणे कुर्ला कॅम्प रस्ता, नेताजी गार्डन जवळी निवासस्थान जागेसह इतर जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर