शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यासाठी पालिकेला सापडला मुहुर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:20 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यास सुरवात झाली आहे. येत्या आठ दिवसात हा परिसर कचरामुक्त करण्यात येणार असून भविष्यात येथे लहान मुलांसाठी उद्यान तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवाघोबा आणि भास्कर नगर रहिवाशांचा मार्ग होणार सुकरउद्यानाची केली जाणार निर्मिती

ठाणे - मागील कित्येक वर्षे पारसिक टनेलवर साचलेल्या कचऱ्याचे ढीग हटविण्याची मोहीम अखेर ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. या टनेलवरील कचरा पालिकेने जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करुन काढण्यास सुरवात केली असून येत्या आठ दिवसात हा टनेल स्वच्छ झालेला दिसेल असा दावा पालिकेने केला आहे. तसेच वाघोबा आणि भास्कर नगर भागाच्या येथील मधील जागेत लहान मुलांसाठी एक उद्यानही येथे भविष्यात साकारले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी दिली.            भास्कर नगर आणि वाघोबा नगरला जोडणारा पारसिक टनेल हा महत्वाचा दुवा ठरत आहे. या दोन्ही भागात झोपडपट्टींचे साम्राज्य अधिक आहे. याच झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा हा पारसिक टनेलवर टाकला जात होता. मागील कित्येक वर्षापासून या टनेलच्या वरील बाजू कचऱ्याने भरलेली असायची. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्यही येथे पसरले होते. काही वेळेस किरकोळ आगीच्या घटनासुध्दा या ठिकाणी घडल्या होत्या. या कचऱ्याचा त्रास खालील बाजूने जाणाऱ्या  रेल्वे सेवेवर सुध्दा होत होता.त्यामुळेच येथील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक महेश साळवी आणि इतर नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे वांरवार मागणी केली होती. तसेच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीसुध्दा पाठपुरावा केला होता. परंतु येथील कचरा हटविण्यासाठी साधे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार नव्हते. आता पालिकेची समस्या सुटली असून जर्मन तंत्रज्ञानाचे मशिन पालिकेच्या ताफ्यात समाविष्ट झाले आहे. याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने १३ सप्टेंबर पासून येथील कचरा उचलण्यास सुरवात झाली आहे. टनेलवरील हा कचरा उचलल्यानंतर या भागात लहान मुलांसाठी एक उद्यान तयार करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच भास्कर नगर आणि वाघोबा नगर भागातील रहिवाशांना ये जा करणे सुध्दा सुसह्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात ही मोहीम पार पाडण्यासाठी उपायुक्त मनीष जोशी, बालाजी हळदेकर विशेष लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdumpingकचरा