शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

अखेर मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे गजाआड

By admin | Updated: March 30, 2017 03:57 IST

भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुख्य

ठाणे : भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे याच्यासह आणखी पाच जणांना अटक केली. यात म्हात्रे यांच्यावर गोळीबार आणि चॉपरने हल्ला करणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आता आरोपींची संख्या १२ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फेब्रुवारीत म्हात्रे हे रात्रीच्या सुमारास घरी जाताना त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचा पुतण्या प्रशांत यानेच साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप केला जात होता. हत्येनंतर प्रशांत फरार झाला होता. दरम्यान, राजकीय हस्तक्षेपानंतर प्रकरण ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी तपासाअंती म्हात्रे यांच्या अंगरक्षकासह पाच जणांना अटक केली. मंगळवारी पथकाचे प्रमुख एन.टी. कदम यांच्या पथकाने पाचगणीतून प्रशांत आणि चिरंजीव म्हात्रे (२०) या दोघांना अटक केली. त्यानंतर, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतून शशिकांत म्हात्रे (३३), कु णाल ऊर्फ नारळ्या म्हात्रे (२८) आणि रजनी ऊर्फ रजनीकांत म्हात्रे यांना अटक केली. कुणाल याने गोळीबार तर चिरंजीव, रजनीकांत या दोघांनी चॉपरने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)