शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘अनुत्तीर्ण’ अनुजाला ८७ टक्के!

By admin | Updated: June 19, 2016 04:17 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील सेंट आॅगस्टिन शाळेच्या अनुजा अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केले होते.

- जितेंद्र कालेकर,  ठाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील सेंट आॅगस्टिन शाळेच्या अनुजा अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केले होते. ‘लोकमत’मध्ये या संदर्भातील सविस्तर वृत्त ९ जूनला प्रसिद्ध होताच बोर्डाने आपली चूक सुधारु न अनुजाने परीक्षा दिलेल्या संस्कृत विषयाचे गुण तिच्या गुणपत्रिकेत समाविष्ट केले आहेत. तिला या विषयात ८७ गुण मिळाले आहेत. तिची नाहक अनुपस्थिती दाखविलेला हिंदी विषय आता गुणपित्रकेतून वगळला असून ८७ टक्के गुणांनी ती उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षा प्रवेशपत्रामध्ये तिने संस्कृतऐवजी हिंदीची परीक्षा दिल्याचे दाखविले होते. ‘लोकमत’ च्या मदतीने अरगडे कुटुंबीयांनी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणला. त्यांनी गंभीर दखल घेत राज्य मंडळाकडून तिच्या संस्कृतच्या पेपरची माहिती घेतली. तब्बल ६० लाख पेपरमधून तिचा पेपर शोधण्यात आला. दुरूस्ती वेळेत न झाल्याने घोळ शाळेने अनुजाच्या रिसीटवरील विषयांच्या दुरुस्तीचे पत्र दिले होते, मात्र ते अनवधानाने दुरुस्त झाले नाही. वाशी कार्यालयातून राज्य मंडळाकडे याची दुरुस्ती न झाल्याने हा प्रकार घडला. पालकांनी ही चुक निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य मंडळाकडील ६० लाख पेपरमधून तिचा संस्कृतचा पेपर शोधण्यात आला. त्यातून तिला प्रत्यक्ष मिळालेल्या आणि अंतर्गत गुणांची पडताळणी करुन ते गुण तिच्या गुणपत्रिकेत समाविष्ट केले आहेत.- दत्तात्रय जगताप, मुंबई विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेनव्या निकालाने आनंद झालाआॅनलाईन निकालात अनुजा अनुत्तीर्ण असल्याचे दिसत होते. परंतु मंडळाचे अध्यक्ष जगताप यांनी तातडीने कार्यवाही करुन आठ दिवसांतच तिच्या संस्कृतच्या गुणांचा गुणपत्रिकेत समावेश केला. अजूनही बोर्डाच्या संकेतस्थळावर दुरुस्ती झाली नसली, तरी आम्हाला ती उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. आता तिच्या अकरावी प्रवेशाचा मार्गही मोकळा झाला आहे.- भारती कैलास अरगडे, अनुजाची आई