शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

अखेर दिघा रेल्वे स्थानकाला मुहूर्त सापडला, रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 2:30 AM

नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत.

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत. एमयूटीपी अर्थात मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ ही कामे करणार असून त्यावर पहिल्या टप्प्यात १०७ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कर्जत-कसारापर्यंतच्या प्रवाशांना ठाण्याला न येता थेट कल्याणमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी हे स्थानक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.ठाणे आणि वाशी-पनवेल मार्गावर सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदर नजीकचा पूल आणि दिघा रेल्वे स्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नत मार्गाचाच भाग आहेत. त्यातीलच दिघा रेल्वे स्थानक येत्या तीन वर्षांत उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे.सध्याच्या ऐरोली नॉलेज पार्कसमोर हे स्थानक उभे करण्यात येणार आहे. नॉलेज पार्कमधील पटनी कॉम्प्युटर्ससह इतर आयटी कंपन्या आणि कळवा ईस्ट, विटावा, दिघा परिसर तसेच तेथील एमआयडीसी उद्योगांतील कामगारांना हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी दिघासह पावणे स्थानक व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनीही काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कल्याणहून थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी आवश्यक असलेला कळव्याच्या रेतीबंदरनजीकचा उड्डाणपूल आणि दिघा रेल्वे स्थानक लवकर मार्गी लागावे, यासाठी तेथील अतिक्रमणे काढून इतर अत्यावश्यक परवानग्या तत्काळ द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वे विकास महामंडळाने ही अतिक्रमणे हटविण्यासह दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी या निविदा मागविल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत त्या उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.ठाणे स्थानकावरील ताण कमी होणारसध्या कसारा-कर्जतच्या प्रवाशांना नवी मुंबईला रेल्वेमार्गे जायचे झाल्यास कल्याणमार्गे ठाणे स्थानकातून उतरून नंतर ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईला जावे लागते.मात्र, कळव्यानजीक पारसिक डोंगरराजीजवळ वळण घेणारा उड्डाणपूल बांधल्यास ठाण्याला न येता थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता येणार आहे. त्यासाठी ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांच्या मध्ये दिघा हे नवे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे.हा मार्ग कार्यान्वित झाल्यास कर्जत-कसारा भाागातील प्रवाशांना ठाण्याला न येता थेट नवी मुंबईला जाणे सोपे होणार असून त्यात त्यांचा वेळ, पैशाची बचत होईलच; शिवाय ठाणे स्थानकावरील ताणही कमी होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे