शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ताडी व्यवसायाला अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:57 IST

सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

- हितेन नाईकपालघर : अल्पभूधारक व बेरोजगार असलेल्या भंडारी समाजाच्या परंपरागत ताडी व्यवसायाला आता अखेरची घरघर लागली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ताडी व्यवसाय खुला करून या समाजाच्या उदरनिर्वाहाच्या साधनासह सहकार्याची बीजे घट्ट रोवली होती, परंतु नंतर सर्वच सत्ताधाऱ्यांनी व्यापारीकरणाचे धोरण राबविल्याने हा व्यवसाय आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अन्यायाविरोधात मोर्चे-आमरण उपोषणाद्वारे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष विजय राऊत यांनी दिला आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू ते एडवण या भागात राहणाऱ्या भंडारी समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी शेतीव्यतिरिक्त खाजरी-माडावरून निघणाऱ्या ताडी विक्रीचा जोडधंदा हा समाज अनेक वर्षांपासून करीत आला आहे. १९६८ सालापासून ताडी व्यवसायाला सुरुवात होत आज सहकारी संस्थांच्या माध्यमातून हा शेतीपूरक व्यवसाय सुरू ठेवला असताना शासनाच्या ताडी विक्री परवान्याबाबतच्या बदलत्या धोरणाचा फटका सहकारी संस्थांना बसून धनदांडग्यांचा शिरकाव या व्यवसायात सुरू झाला आहे. परप्रांतीय व्यावसायिकांना शिरकाव करून देताना शासनाचे बदलते धोरण स्थानिक भंडारी व्यावसायिकांना उद्ध्वस्त करीत आहे. परिणामी, अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नावाखाली शरीराला पोषक असणाऱ्या या पेयाचे डुप्लिकेशन करून या व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आंदाेलनाचा इशारा दिला आहे.या धंद्यापासून भंडारी समाजास सारले जात आहे दूरया धंद्यापासून भंडारी समाज दूर सारला जाऊ लागला असून सहकारी संस्था हळूहळू बंद पडू लागल्या आहेत. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या ४० संस्थांपैकी सातपाटी, वडराई, माहीम येथील फक्त तीन सहकारी संस्था मागील काही वर्षांपासून तग धरून हा व्यवसाय वाचविण्याचा खटाटोप करीत असल्याचे अध्यक्ष विजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. २०१२ पासून तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यापासून ते विद्यमान पालकमंत्री दादासाहेब भुसे अशा डझनभर मंत्र्यांना आतापर्यंत निवेदने देण्यात आल्यानंतरही भंडारी समाजाच्या समस्या आजही जैसे थे आहेत.