शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका बोगस पत्रकार वर खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 22:39 IST

मीरा भाईंदर मध्ये आणखी एका बोगस पत्रकारावर अनधिकृत बांधकामात खंडणी प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये आणखी एका बोगस पत्रकारावर अनधिकृत बांधकामात खंडणी प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंदनसिंह ठाकूर असे खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकार असे नाव आहे.

मीरारोडच्या शिवार उद्यान मागे तक्रारदाराने भागीदारीत क्रिकेट टर्फ व स्नुकर एका शेड मध्ये चालवत होता.  महापालिका आरक्षणाच्या मोकळ्या जागेत हा बेकायदा क्रिकेट टर्फ व स्नुकर टेबल असल्याची लेखी तक्रार करून पालिका अधिकाऱ्यां कडे कारवाईचा तगादा ठाकूर याने गेल्या वर्षां पासून चालवला होता.  तर तक्रारदारा कडून त्याने ८० हजारांची खंडणी मागितली होती. तक्रारदाराने त्याच्या सांगण्या वरून  १० हजार रुपये राघवेंद्र दुबे नावाच्या इसमाच्या खात्यात टाकले. 

पण उर्वरित ७० हजार रुपयांची मागणी करत त्याने तक्रारी सुरूच ठेवल्या होत्या. पालिकेनी एकवेळा तोडक कारवाई केली मात्र त्यांनी ती अर्धवट कारवाई केली म्हणून पुन्हा त्याने तक्रारी केल्या. 

तक्रारदाराने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या कडे तक्रार केल्यावर मीरारोड पोलिसांनी चंदनसिंह ठाकूर वर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ठाकूर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवकुमार गायकवाड हे करत आहेत.

अनेक बेकायदा व अनधिकृत बांधकामाच्या हा पत्रकार म्हणून करत होता.  तो स्वतःला नांदेड जिल्ह्यातील लोकअपेक्षा वेब पोर्टल तसेच मुंबई शहर साप्ताहिकचा पत्रकार सांगत फिरत असे. त्याच्या विरुद्ध उत्तन येथील एकाने देखील खंडणी मागत असल्याची तक्रार पोलिसात केली होती. या आधी महिन्या भरा पूर्वी भाईंदरच्या राई, शिवनेरी येथील सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यां कडून खंडणी उकळणाऱ्या दोन बोगस पत्रकारांना पोलिसांनी अटक केली होती.