शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘फाइल चोरी’ प्रकरणाला फुटले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:46 IST

महापालिकेच्या बांधकाम विभागातील ‘फाइल चोरी’ प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना न्यायालयाने १६ मेपर्यंत

उल्हासनगर : महापालिकेच्या बांधकाम विभागातील ‘फाइल चोरी’ प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना न्यायालयाने १६ मेपर्यंतपोलीस कोठडी दिली असून, त्यांचे घर आणि आॅफिसची झाडाझडती पोलीस घेत आहेत. त्यात ३०पेक्षा अधिक फाइल मिळाल्याची चर्चा रंगली असली, तरी त्याला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. यापूर्वी फाइल चोरी प्रकरणात ज्यांची ज्यांची नावे पुढे आली होती, ते अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.उल्हासनगर पालिकेच्या बांधकाम विभागातील फाइल चोरीचा व्हिडीओच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षाची अब्रू गेली. त्यानंतर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शहर अभियंता महेश शीतलानी यांना दिले. त्यानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रामचंदानी यांना अटक झाली. न्यायालयाने त्यांना १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी रामचंदानी यांच्या घर व आॅफिसची झडती घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार इतर फाइलचा शोध सुरू आहे. या झडतीत ३० पेक्षा जास्त फायली सापडल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. फायलींची चोरी उघड झाल्याने पोलीसही हैराण झाले असून, आता अन्य फायलींचा शोधही सुरू असल्याची माहिती गोयल यांनी दिली.ही फाइल चोरी उघड झाल्यावर महापालिकेतील अन्य चोरीच्या घटनांची खमंग चर्चा सुरू झाली. यापूर्वी फायली चोरण्याचेआणि त्यातून गुन्हे लपविण्याचे प्रकार झाले. त्यांच्यावरही रामचंदानी यांच्याप्रमाणे गुन्हे दाखल करा, अशी मागणी मनसे कामगार संघटनेचे दिलीप थोरात यांनी केली. त्यांनी सोमवारी सकाळी आंदोलनाचा इशारा दिला आहे.