शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत फाईल घोटाळा?, माजी उपमहापौर टार्गेटवर, आयुक्तांचे चौकशीचे आदेश

By सदानंद नाईक | Updated: October 12, 2022 17:26 IST

Ulhasnagar Municipal Corporation: महापालिका बांधकाम विभागातील विकास कामाची फाईल कर्मचाऱ्याकडून मंगळवारी माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी नेल्या प्रकरणी एकच गोंधळ उडाला

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका बांधकाम विभागातील विकास कामाची फाईल कर्मचाऱ्याकडून मंगळवारी माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी नेल्या प्रकरणी एकच गोंधळ उडाला. आयुक्त अजीज शेख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश देऊन नोटिसाच्या खुलासा मागितला आहे. तर इदनानी यांनी आपला याप्रकरणाशी काही एक सबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग नेहमी वादात राहिला असून यापूर्वी एका भाजप नगरसेवकांवर फाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. चोरी प्रकरणी आजी नगरसेवकाने अनेक दिवस पोलीस कष्टडीत घालवले. दरम्यान मंगळवारी माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी बांधकाम विभागातील एका महिलेकडून दमदाटी करून विकास कामाच्या दोन फाईल घरी घेऊन गेल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री, भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी करून खळबळ उडवून दिली. बांधकाम विभागाचे प्रमुख व शहर अभियंता प्रशांत साळुंके यांनी विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्यांकडून फाईल खाजगी कार्यालयात नेल्या असून सदर फाईल विभागात आल्याचे म्हटले. तर आयुक्त अजीज शेख यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याकडून इदनानी फाईल घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधितांना नोटिसा देऊन खुलासा मागितला आहे.

महापालिकेतील विभागातून फाईल चोरी जाऊन नंतर सापडत असल्याच्या घटना नेहमी घडत आहेत. मात्र मंगळवारी घडलेली घटना गंभीर असून महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले. तर माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी बांधकाम विभागातून फाईल नेल्याची घटनेच्या इन्कार केला. तसेच फाईल नेल्याचा बिनबुडाचा आरोप गंगोत्री व रामचंदानी हे करीत असल्याचे ते म्हणाले. बांधकाम विभागाचा कारभार ४ अभियंता यांच्या खांद्यावर असून कमीतकमी १२ अभियंता पदाची गरज आहे. अपुऱ्या अभियंता पदामुळे विभागात गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. 

 विकास कामाची फाईल माजी नगरसेवकाकडे?महापालिकेतील पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, विधुत विभाग आदींसह अन्य विभागाच्या विकास कामाच्या फाईल कर्मचाऱ्यांच्या हस्ते एका विभागाकडून दुसऱ्या विभागात जातो. मात्र पालिकेत माजी नगरसेवक हे विकास कामाच्या फाईल हाती घेऊन अधिकाऱ्यांच्या सही साठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे. असे प्रकार आयुक्तांनी थांबवावी. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे