शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:49 IST

नव्याने दिल्या जाणाऱ्या रिक्षांच्या परमिटमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याच्या ‘लोकमत’च्या ठाणे हॅलोमधील वृत्ताची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दखल

- लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : नव्याने दिल्या जाणाऱ्या रिक्षांच्या परमिटमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याच्या ‘लोकमत’च्या ठाणे हॅलोमधील वृत्ताची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेत परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. रिक्षाच्या नव्या परमिटकरिता प्रत्येकी ५० हजार रुपये उकळले जात असल्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले. परिवहन विभागाने या संदर्भात लेखी आदेशपत्र काढले असून परमिटच्या फी व्यतिरिक्त कोणी जादा पैसे मागितले, अथवा घेतले असतील तर अशा अर्जदारांनी तातडीने अ‍ॅन्टीकरप्शन अथवा परिवहन विभागाला विभागाला माहिती द्यावी. परमिटकरिता पैसे स्वीकारणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. जे अर्जदार अशी प्रकरणे निदर्शनास आणतील त्यांना बक्षिस स्वरुपात ठोस रक्कम जरी देता आली नाही तरी त्यांच्या परमिटचे काम एका दिवसात करण्यात येईल, असे गेडाम यांनी जाहीर केले. अशी फिरली सूत्रे*मंगळवारी हॅलो ठाणेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची माहिती शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिली. रावते यांनी तत्काळ या प्रकरणाची माहिती घेण्याचे आदेश परिवहन आयुक्त डॉ. गेडाम यांना दिले. त्यानंतर परिवहन आयुक्तांच्या कार्यालयातून ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीला फोन आला, आणि वरील आदेश जारी झाले.मनसेसह भाजपानेही मानले आभारमनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम आणि भाजपाच्या रिक्षा युनियनचे खजिनदार दत्ता माळेकर यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. सर्वसामान्यांचे आर्थिक शोषण सुरु होते. त्याला या वृत्तामुळे वाचा फुटली. जनजागृती होण्यास मदत झाली. माळेकर यांनी सांगितले की, परिवहन मंत्र्यांना युनियनच्या माध्यमातून पत्र देण्यात येत आहे. डोंबिवलीतील एका रिक्षा चालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, मनसे जरी याप्रश्नी आवाज उठवत असली तरी मनसेचेही काही दलाल यात सामील असून त्यांनीही अनेकांचे अर्ज भरले आहेत. तसेच या बातमीमुळे कल्याण परिवहन कार्यालयात अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु असल्याचे चित्र असल्याचे सांगण्यात आले.