शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

पुस्तकाद्वारे यकृतदानाचा लढाऊ प्रवास

By admin | Updated: June 30, 2017 02:47 IST

अवयवदानामुळे गरजूंना जीवनदान तर मिळते. मात्र, त्याचबरोबर त्यांच्यात जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. अवयवदान हे खरंच श्रेष्ठदान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अवयवदानामुळे गरजूंना जीवनदान तर मिळते. मात्र, त्याचबरोबर त्यांच्यात जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. अवयवदान हे खरंच श्रेष्ठदान आहे. त्यातच तनुजा यांनी भावासाठी यकृतदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हाच लढाऊ प्रवास त्यांनी पुस्तकातून सर्वांसमोर आणला आहे, असे मत प्रसिद्ध डॉ. नितीन नरावणे यांनी मांडले.जयंत झांबरे लिखित आणि व्यास प्रकाशन प्रकाशित ‘आकाश उजळून येताना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. पारिजात गुप्ते, निलेश गायकवाड उपस्थित होते. जयंत झांबरे हे यकृताच्या आजाराने ग्रस्त असताना बहीण तनुजा यांनी यकृतदान केल्याने झांबरे पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगत आहेत. यकृताच्या आजारावर यकृत प्रत्यारोपण ही नवसंजीवनी ठरते आहे, असे मतही नरावणे यांनी व्यक्त केले. या वेळी बोलताना लेखक जयंत यांनी यकृताचा आजार झाल्यापासून ते यकृत प्रत्यारोपणापर्यंतचे अनुभव उपस्थितांना सांगितले. तसेच यकृत प्रत्यारोपणाबाबत समाजात अनेक समजगैरसमज आहेत. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हे पुस्तक मी अधिकाधिक लोकांपर्यंत विनामूल्य पोहोचवणार आहे, असेही झांबरे यांनी सांगितले. तर, यकृतदानाचा हा प्रवास म्हणजे जिद्दीची, नात्याच्या अनुबंधाची आणि खंबीरतेची एक गोष्ट आहे, असे निलेश गायकवाड यांनी सांगितले.