शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचे बेमुदत उपोषण

By admin | Updated: October 6, 2016 03:00 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेली कारवाई चुकीची आहे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेली कारवाई चुकीची आहे, असा आरोप करीत न्यायालयीन लढ्याच्या पवित्र्यात असलेली फेरीवाला संयुक्त संघर्ष समिती उद्या गुरुवारपासून बेमुदत उपोषण छेडणार आहे. सात दिवसांत ठोस निर्णय घ्या, अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा समितीने निवेदनाद्वारे दिला होता. परंतु, आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्यांना दाद न दिल्याने हे आंदोलन छेडले जाणार आहे.फेरीवाला नोंदणीचे अधर्वट असलेले सर्वेक्षणाचे काम पूर्ण करा, नोंदणीकृत फेरीवाल्यांना आहेत, त्याच ठिकाणी पट्टे मारून संरक्षण द्या, नोंदणीकृत फेरीवाल्यांची यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करा, फेरीवाला हटाव पथके बेकायदा असल्याने ती रद्द करावीत, फेरीवाला कायदा २०१४ ची अंमलबजावणी युद्ध पातळीवर दैनंदिन पद्धतीवर सुरू करावी, याप्रमुख मागण्या फेरीवाल्यांच्या आहेत.कल्याण-डोंबिवली शहरातील फेरीवाला संघटनांनी एकत्रित येऊन न्याय हक्कांसाठी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना केली आहे. फेरीवाला कारवाईविरोधात फेरीवाल्यांमध्ये असंतोष पसरला आहे. फेरीवाला संघटना न्यायालयीन लढा देण्याचा पवित्र्यात आहेत. महापालिकेची कारवाई चुकीची असून पोलीसही त्यांना बेकायदा संरक्षण देत आहेत. ही कारवाई त्यांनी न थांबवल्यास या दोघांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय मध्यंतरी झालेल्या बैठकीत घेतला आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स आणि नो हॉकर्स झोनचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करून हरकतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांच्या पुर्नवसनाची योजना तयार करून त्यांना विक्री प्रमाणपत्र देईपर्यंत फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करण्यास कायदेशीर मनाई असल्याचे समितीचे म्हणणे आहे. फेरीवाला हटाव पथके स्थापन करून फेरीवाल्यांचा माल नष्ट करणे, हुसकावून लावणे, महिला विक्रेत्यांचा विनयभंग करणे अशी गैरवर्तणूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार इशारा देऊनही प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवल्याने संघर्ष समितीने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. (प्रतिनिधी)