शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

भिवंडीत अपेक्षेप्रमाणे रंगणार बहुरंगी लढती

By admin | Updated: May 13, 2017 00:36 IST

वेगवेगळ््या पक्षांच्या उमेदवारांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भिवंडीच्या निवडणुकीत बहुरंगी लढती होतील, हे स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : वेगवेगळ््या पक्षांच्या उमेदवारांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भिवंडीच्या निवडणुकीत बहुरंगी लढती होतील, हे स्पष्ट झाले. मात्र पालिकेच्या वेगवेगळ््या कार्यलयांतील आणि मुख्यालयातील समन्वयाच्या अभावामुळे नेमक्या किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार उरले, याचा नेमका आकडा समजू शकला नाही. पालिका निवडणुकीत काँग्रेस ६४, भाजपा ६३, शिवसेना ५७, समाजवादी पार्टी- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ७०, एमआयएमचे ९, कोणार्क विकास आघाडीचे २२, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टचे १३ आणि आरपीआय एकतावादीचे ४ उमेदवार रिंगणात आहेत. शिवाय इतर छोटे पक्ष, अपक्ष रिंगणात असल्याने ही लढत बहुरंगी होणार हे स्पष्ट होते. काँग्रेसने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण आम्ही या शर्यतीतून मागे हटणार नाही, अशी भूमिका प्रदेश सरचिटणीस प्रदीप पप्पू रांका यांनी घेतली. त्याचवेळी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीनेही महापौर आमचाच होईल, असा दावा केला आहे. भाजपाविरोधात एकासएक लढत व्हावी यासाठी वोगवेगळ््या पक्षांमध्ये चर्चा झाली असली, तरी त्यासाठी कोणीही माघार घेतली नसल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. भाजपाविरोधाचा अजेंडा शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी, एमआयएम या सर्वांनी राबवला आहे. त्यामुळे भाजपा आणि कोणार्क आघाडीने समझोता केला असला, तरी त्यांच्याविरोधात तुल्यबळ लढत होईल, असा या पक्षांचा प्रयत्न आहे. अर्थात या पक्षांनाही फाटाफुटीचे ग्रहण लागले आहे. समाजवादी पक्षातील फुटीरांना काँग्रेसने स्थान दिले आहे. तर समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीने आपली गळती रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. भाजपाचे निरीक्षक दाखल -संघ परिवार आणि कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही नवभाजपावादी नेत्यांनी कोणार्क आघाडीशी युती लादल्याने भाजपा कार्यकर्ते आणि संघ परिवारातील स्वयंसेवक, परिवारातील इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे लेखी तक्कारी केल्या. एसएमएस पाठवले. त्याची दखल घेत नेमकी परिस्थिती पाहण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहे. ते या युतीच्या फायद्या-तोट्याची माहिती घेतील. तसेच जमेल तेथे नाराजांची समजूत काढतील. कोणार्क विकास आघाडी २२ जागा लढवत असून तेथे भाजपाने उमेदवार दिले नसले, तरी त्या उमेदवारांना मत न देण्याचा निर्णय निष्ठावंतांनी जाहीर केला आहे. त्या उमेदरवारांविरोधात मत देऊ किंवा ‘नोटा’चा वापर करू, असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे या युतीसाठी पुढाकार घेणाऱ्या नवभाजपवाद्यांत खळबळ उडाली आहे.