शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

फेरीवाला हटाव पथके वाऱ्यावर

By admin | Updated: February 21, 2017 05:31 IST

रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला

प्रशांत माने / कल्याणरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या ‘क’ प्रभागातील पथकावर पुन्हा हल्ला झाल्याची घटना नुकतीच शहरात घडली. यातून फेरीवाल्यांमधील मुजोरपणा समोर आला असताना या बळावलेल्या प्रवृत्तीला राजकीय अभय मिळत असल्याने फेरीवाल्यांचा हा मस्तवालपणा दिवसागणिक वाढत आहे. एकीकडे फेरीवाला हटाव व अतिक्रमणविरोधी पथके कुचकामी ठरत असताना त्यांना पुरवले जाणारे पोलीस बळही अपुरे आहे. वारंवार होणारे हल्ले पाहता पथकांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील बोरगावकरवाडी येथे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या ‘क’ प्रभागाच्या पथकावर १० ते १५ जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना आॅगस्टमध्ये घडली होती. यात राजेश पेठकर हा महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. आता अलीकडेच पुन्हा ‘क’ प्रभागाच्या पथकावरच हल्ला झाला. यात पथकातील कर्मचाऱ्यांकडून कारवाईसाठी वापरला जाणारा मोठा हातोडा हिसकावून घेऊन पथकाच्या गाडीवरच प्रहार करून नुकसान करण्याचा प्रकार फेरीवाल्यांकडून घडला आहे. या वेळी एकाने बुटाच्या मोज्यातून चाकू काढून धाक दाखवण्याचा प्रकारही घडल्याने फेरीवाले कशाप्रकारे घातक शस्त्रे बाळगतात, याची प्रचीती यानिमित्ताने आली. याप्रकरणी ‘क’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमधून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांवरील हल्ले यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. आॅगस्ट २०१५ मध्ये डोंबिवली पूर्वेकडील परिसरात ‘फ’ प्रभागाचे तत्कालीन प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांना फेरीवाल्यांनी घेराव घातला होता. तर, जानेवारी २०१४ मध्ये ‘क’ प्रभागातच पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये ‘क’ प्रभाग अधिकारी वानखेडे यांना धक्काबुक्की आणि दमदाटीचा प्रकार घडला होता. जानेवारी २०१६ मध्येही कारवाईच्या वेळी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनाही फेरीवाल्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. हे एकंदरीत चित्र पाहता फेरीवाल्यांमधील मुजोरपणा दिवसागणिक वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पुरवले जात असलेले पोलीस संरक्षण तुटपुंजे आहे. कारवाईच्या वेळी ३ ते ४ पोलीसच असतात. त्यामुळे कारवाई करणे जिकिरीचे होते. किमान १० पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राजकीय अभय कारणीभूतविशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांविरोधात ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही. कल्याणमधील महानगर फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे आहेत. ते शिवसेनेचे विधानसभा संघटक व माजी नगरसेवक आहेत, तर फळे, फुले, भाजीपाला कल्याणकारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी हे भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आहे. पथपथारी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष रमेश हनुमंते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तसेच पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत असाच उद्रेक होत राहील, अशी भूमिका फेरीवाला संघटनांकडून सातत्याने मांडली जाते. सध्याची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप त्यांच्याकडून होतो. एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजपा स्मार्ट सिटीच्या बाता करत असताना त्यांचेच प्रतिनिधी शहराच्या बकालतेला फेरीवाल्यांच्या माध्यमातून का होईना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.