शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रभाग अधिकारी अटकेत

By admin | Updated: July 2, 2017 06:00 IST

घरदुरुस्तीची परवानगी देण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राच्या अधिकारी स्वाती गरूड

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : घरदुरुस्तीची परवानगी देण्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच घेताना केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राच्या अधिकारी स्वाती गरूड यांना ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली. महापालिकेच्या इतिहासात लाच घेणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. तक्र ारदाराने घराच्या दुरु स्तीच्या परवानगीसाठी महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील ‘जे’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, प्रभाग अधिकारी गरूड यांनी ही दुरु स्ती बेकायदा ठरवली. तसेच कारवाई करण्याची धमकी तक्रारदाराला दिली. मात्र, कारवाई टाळण्यासाठी ३० हजार रु पयांची मागणी केली. त्याविरोधात तक्र ारदाराने ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाकडे तक्र ार नोंदवली होती. त्यानुसार, शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून गरूड यांना २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.भ्रष्टाचाराने बरबटलेली महापालिका केडीएमसीकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बरबटलेली महापालिका म्हणून पाहिले जाते. आतापर्यंत उपायुक्त सु. रा. पवार, कार्यकारी अभियंता सुनील जोशी, प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे, सुहास गुप्ते यांच्यासह सुमारे १५ ते १६ कर्मचाऱ्यांना लाचखोरीप्रकरणी अटक झाली आहे. त्यात आता गरूड यांची भर पडली आहे.