शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती रुग्णालयात बाळाला डॉक्टरकडून फिडिंग; डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक

By सदानंद नाईक | Updated: December 17, 2023 21:19 IST

बाळाची आई मनोरुग्ण असल्याने डॉक्टरांचा निर्णय

सदानंद नाईक, उल्हासनगर: मध्यवर्ती रुग्णालयात मनोरुग्ण असलेल्या महिलेच्या बाळाला डॉक्टरांनी फिडिंग केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेने डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी रुग्णालयात रुग्णासाठी असे विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. 

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाने कमी दिवसाच्या व अवघ्या अर्धा किलो वजनाच्या मुलाला उपचार करून जीवदान दिले. तसेच एका महिलेच्या पोटातून अर्धा किलोचा गोळा काढल्याची घटना गेल्या महिन्यात उघड झाल्या आहेत. याच बरोबर रुग्णालयात विविध उपक्रम राबवित असल्याने, उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना मध्यवर्ती रुग्णालयात आपलेसे वाटू लागले. १२ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता एका महिलेने दिड किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. मात्र आई मनोरुग्ण असल्याने, बाळाला फिडिंग करण्यात अडचण येऊ लागली. तसेच डॉक्टरांना याबाबत चिंता वाटू लागली. सदर बाळ इनकुबिटर मध्ये ठेवले असून त्याला फिडींग करावे लागते. परंतु आई मनोरुग्ण असल्याने त्या बालकास फिडींग करू शकत नाही. अशावेळी रुग्णालयचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे व अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ वसंतराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयु कक्षात बाळाला अन्य डॉक्टरांच्या मदतीने फिडिंग करण्याचा निर्णय घेतला.

मध्यवर्ती रुग्णालयाच्या एसएनसीयु कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण यांनी पुढाकार घेऊन स्वतः आपल्या हाताने या बालकास फिडींग केले. तसेच उपचार सुरू केल्याने, रडणारे बाळ शांत होऊन मायेची ऊब मिळाली. डॉक्टरांच्या या उपक्रमाची माहिती रुग्णालयात झाल्यावर डॉक्टरांवर रुग्णालयावर शुभेच्छाचा वर्षाव सर्वच स्तरातून होत आहे. याबाबत रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळून ते बरे व्हावे. अशी भूमिका असते. यातूनच बाळाला डॉक्टरांनी फिडिंग केल्याचे सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरulhasnagarउल्हासनगर