मुंब्राः रिक्षाचालकाच्या मदतीने रिक्षातील प्रवाशाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली. कल्याण येथील काटेमानवली भागातील पावशे चौकात राहणारे धीरेंद्र पांडे शीळफाटा ते कल्याण डोंबिवली रोड जवळील एका हॉटेल दरम्यान रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी रिक्षात बसलेल्या दोन सहप्रवाशांनी रिक्षाचालकाच्या मदतीने पांडे यांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून ५५ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख ४८० रुपये लुटून पोबारा केला, अशी तक्रार पांडे यांनी शनिवारी दाखल केली. या तक्रारीवरून रिक्षाचालकासह तिघांवर शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शस्त्राचा धाक दाखवून रिक्षाप्रवाशाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:24 IST