शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भय येथे उरले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:11 IST

कल्याण-डोंबिवलीत फटाक्यांचा धूर  

n  प्रशांत मानेलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाचा धोका पाहता राज्य सरकारने केवळ लक्ष्मीपूजनाला लहान फटाके वाजवण्यास परवानगी दिली होती. मोठे फटाके वाजवू नका, असे आवाहनही केले होते. पण, या आवाहनाला कल्याण-डोंबिवलीत फारसा प्रतिसाद न मिळाल्याचे पाहायला मिळाले. फुलबाजांसह पाऊस आणि चक्र असे लहान फटाके उडवण्यासाेबतच बहुतांश भागांमध्ये सुतळीबॉम्बसह फटाक्यांच्या मोठ्या लवंगी माळांची आतषबाजी झाल्याचे दिसून आले.कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ हजारांच्या आसपास पोहाेचला आहे. तर, शनिवारपर्यंत एक हजार २७ जणांचा मृत्यू झाला होता. रुग्णसंख्या घटत असली, तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता खबरदारीचे आवाहन केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे नागरिकांना करत आहेत. प्रदूषणाची पातळी कायम राखण्यासाठी दिवाळीत फटाके मर्यादित स्वरूपात फोडण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी आतषबाजी झाल्याचे दिसले. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, काटेमानिवली, कोळसेवाडी, पुणे लिंक रोड तर पश्चिमेतील आधारवाडी, खडकपाडा, मुरबाड रोड, रामबाग, संतोषीमाता रोड, चिकणघर आणि डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा, मानपाडा रोड, गोग्रासवाडी, गांधीनगर, आयरे रोड, शेलार चौक, पश्चिम भागातील गरिबाचावाडा, गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, दीनदयाळ रोड, उमेशनगर, मोठागाव ठाकुर्ली, कोपर, बावनचाळ या ठिकाणी शनिवारी संध्याकाळी सुतळीबॉम्ब, पाच ते १० हजारांच्या लवंगीच्या माळा, आकाशात जाऊन फुटणारे फटाके उडवून दिवाळीचा आनंद लुटण्यात आला. निष्काळजीमुळे येणार काेराेनाची दुसरी लाटठाकुर्लीतही रेल्वे समांतर रस्ता असो अथवा ९० फूट रोड याठिकाणच्या गृहसंकुलांच्या परिसरात मोठ्या आवाजांचे फटाके सर्रास उडवले जात होते. यामुळे परिसरात धूरही झाला होता. नागरिकांचा हा निष्काळजीपणा कोरोनाची दुसरी लाट येण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी विजय भोसले यांनी दिली.