शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील एफडीएची प्रकरणे निघणार झटपट निकाली; न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 05:04 IST

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुण्याच्या धर्तीवर ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा अभिनव उपक्रम लवकरच कोकण विभागात राबवणार आहे.

- पंकज रोडेकरठाणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुण्याच्या धर्तीवर ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा अभिनव उपक्रम लवकरच कोकण विभागात राबवणार आहे. त्यामुळे एफडीएसंबंधी प्रलंबित असलेल्या शेकडो प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होऊन वादी आणि प्रतिवादी यांचा पैसा आणि वेळेची बचत होणार आहे. जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित जिल्ह्यांतील प्रकरणांचा दरमहा आढावाही घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या विभागात काही महिन्यांपासून जवळपास एक हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. कोकण विभागाचे मुख्यालय ठाण्यात आहे. त्यामुळे वादी आणि प्रतिवादींना दाद मागण्यासाठी नेहमी ठाण्यात यावे लागते. यामध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो.या उपक्रमामुळे हे टळणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या अडीअडचणींचा आढावाही घेता येणार आहे. सुरुवातीला हा उपक्रम नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. त्यानंतर, पहिल्यांदा पुण्यात राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील जवळपास ६०० प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यात सर्वाधिक प्रकरणेठाणे जिल्ह्यात प्रकरणांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यात १० उपविभाग आहेत. तेथेच दरमहा जास्तीतजास्त प्रकरणांचा निपटारा लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.एफडीएच्या पुणे विभागामध्ये ‘न्याय निर्णय जिल्ह्याच्या दारी’ हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्याच धर्तीवर कोकण विभागातील प्रकरणे मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम लवकरच राबवला जाईल. ही संकल्पना मंत्री गिरीश बापट यांची आहे. पुण्याप्रमाणेच कोकणातही याला चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच जिल्ह्यांमध्ये दरमहा आढावा घेतला जाईल.- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (कोकण)

टॅग्स :thaneठाणे