शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील बिकानेर स्वीट्सला एफडीएचा दणका: व्यवसाय बंद करण्याचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: August 9, 2023 20:32 IST

ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई : मुदतीचा उल्लेख नसण्यासह अनेक त्रुटी

ठाणे: जनहित व जनआरोग्याचे सर्वच नियमावली पायदळी तुडविल्याचा ठपका ठेवत तसेच सुटया िमठाईवर मुदतीचा उल्लेख नसण्यासह अनेक त्रुटी आढळल्यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील बिकानेर स्वीट्स या मिठाई विक्रेत्यास व्यवसाय बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने काढले आहेत. अशाप्रकारे नामांकित स्वीट्स दुकानांमध्ये व्यवसाय बंद करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी दिली. याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरची पहिलीच कारवाई आहे. अन्न व अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे, ठाण्याचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासारवडवलीतील बीकानेर स्वीट्स मिठाई शॉपची अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक तपासणी केली. या तपासणीत विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई व फरसाण आदी अन्न पदार्थाचे उत्पादन करीत असल्याचे आढळले.

तसेच अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरलेले पाणीही पिण्यायोग्य असल्याचा अहवालही नव्हता. अन्न पदार्थ हाताळणारे कामगार संसर्गजन्य त्वचारोग आणि तशाच आजारापासून मुक्त आहेत किंवा नाही, याचीही खातरजमा होण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकाकडून तपासणी केलेली नव्हती. उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी आवश्यक शैक्षिणक पात्रतेच्या व्यक्तीती पर्यवेक्षक" म्हणून नेमणूक नव्हती. अन्नपदार्थाच्या खरेदीची बिले नव्हती. मिठाई विक्री करताना ट्रे वर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणानुसार खुल्या स्वरुपात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या कंटेनरवर अन्नपदार्थाच्या मुदतीची तारखेचा तपशीलाचा उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळेच सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांच्या पथकाने ही कारवाई केली.अन्नपदार्थाचे विक्रीसाठी उत्पादन करताना कोणतीही व खबरदारी घेतलेली नसल्याचे िबकानेर या दुकानात आढळले. त्यामुळेच त्रुटीची पूर्तता करेपर्यत बिकानेर स्वीट्स विक्रेत्याला व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.नियमांचे उल्लंघन केल्यास दाेन लाखांच्या दंडाची कारवाई हाेउ शकते.सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), काेकण विभाग, अन्न व औषध प्रशासन, ठाणे

टॅग्स :thaneठाणे