शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पोटच्या मुलीवर बापाचा अत्याचार

By admin | Updated: November 6, 2016 03:54 IST

पोटच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रण दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्यासह तिच्या सावत्र आईला नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. नराधम पिता

ठाणे : पोटच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रण दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्यासह तिच्या सावत्र आईला नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. नराधम पिता माजी सैनिक असून, सध्या तो एका बँकेच्या मुख्यालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.पीडित मुलगी ही सावत्र आई आणि नराधम पित्यासह खोपट हंसनगर येथे राहते. मुलीच्या आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न करून ते ठाण्यात राहत आहेत. मध्यंतरी घरात काम करण्यासाठी नराधम पित्याने तिला ठाण्यात ठेवले आणि तिच्या लहान भावांना तो बिहारमध्ये गावी ठेवून आला होता. महिन्यापासून तो धमकावून तिच्यावर अत्याचार करत होता. या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी संधी मिळताच शेजारच्या महिलेकडे मदत मागितली. ती कोणाशी तरी बोलते हे पाहून तिच्या सावत्र आईने तिला घरात नेले आणि मारहाण करीत खोलीत कोंडले. नंतर तिने घराच्या गॅलरीतून रडत-रडत रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांकडे मदत मागण्यास सुरुवात केली. ते पाहून काही जणांनी विचारणा केली. तेव्हा हा प्रकार पुढे आला. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिची तक्रार दाखल करीत अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत तिच्या वडिलांसह सावत्र आईला अटक केली. (प्रतिनिधी)