शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

पितृपक्षाचा फटका :फुले झाली कवडीमोल, भाव घसरल्याने फुले कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 04:03 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुलबाजार भरतो. कल्याण परिसराला सिन्नर, जुन्नर, नाशिक, आळेफाटा, अहमदनगर या भागांमधून फुलांचा पुरवठा होतो.

कल्याण : सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाचा मोठा फटका फुलउत्पादक शेतकºयांना सोसावा लागत आहे. फुलांची आवक दहापटीने वाढली असून त्या तुलनेत मागणी घटल्याने फुलउत्पादक मेटाकुटीस आले आहेत. एरव्ही, ३० ते ४० रुपये किलोप्रमाणे विकल्या जाणाऱ्या झेंडूचे भाव अवघ्या पाचसहा रुपयांवर घसरल्याने हतबल झालेल्या शेतकºयांना दररोज फुलांचे ढीगच्या ढीग अक्षरश: कचºयात टाकून द्यावे लागत आहेत.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुलबाजार भरतो. कल्याण परिसराला सिन्नर, जुन्नर, नाशिक, आळेफाटा, अहमदनगर या भागांमधून फुलांचा पुरवठा होतो. दररोज साधारणत: ५० प्रकारची फुले या बाजारात विक्रीसाठी आणली जातात. बंगळुरू, गुजरातमधूनही येथील बाजारात फुले विक्रीसाठी येतात. महत्त्वाचे म्हणजे, ठाणे व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात होत असते. शहापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड व उल्हासनगर या पाच तालुक्यांमधील हजारो किरकोळ फुलविक्रेत्यांचा व्यवसाय या बाजारावरच अवलंबून आहे.यंदा वरुणराजाने शेतकºयांवर कृपादृष्टी दाखवली. पाऊस चांगला झाल्याने फुलांचे उत्पादन वाढले; परंतु पितृपक्ष सुरू असल्याने ग्राहकांकडून फुलखरेदी कमी होत आहे. फुलांची मागणी कमी झाल्याने ती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही खराब होत असलेली फुले कचºयामध्ये फेकली जात आहेत. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळीसह लग्नसराईच्या काळात फुलांना मागणी असते; परंतु सध्या आवक वाढली आणि मागणी घटल्याने शेतकºयांवर विदारक परिस्थिती ओढवली असल्याचे कल्याण कृषी समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले.आवक दहापटसध्या दररोज तीन ते चार टन फुले येतायत. गणपतीला झेंडूचा भाव ३० ते ४० रुपये प्रतिकिलो होता. आता मागणी घटल्याने माल उरतो. उरलेली फुले खराब होत असल्याने ती फेकली असावी, असे बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले. फुलांची आवक दहापटीने वाढली आहे. परंतु, भाव पाच ते सहा रुपये प्रतीकिलोपर्यंत घसरल्याची माहिती फळे-फुले-फेरीवाला कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :thaneठाणे