शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून वडिलांचाही मृत्यू

By admin | Updated: October 9, 2016 08:05 IST

शहापूर तालुक्यातील मुरबीचापाडा येथे राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीला रात्री साप चावल्याने तिला शहापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिकच

ऑनलाइन लोकमत

भातसानगर, दि. ९ : शहापूर तालुक्यातील मुरबीचापाडा येथे राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीला रात्री साप चावल्याने तिला शहापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारांसाठी ठाणे येथे नेत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही बातमी कळताच तिच्या वडिलांनीही प्राण सोडले. या घटनेनंतर तिच्या आईचीही प्रकृती चिंताजनक झाली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

रेश्मा धावू वाख (१३) असे या मुलीचे नाव असून, भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी मुरबीचापाडा येथे ती राहत होती. ती रात्री घरात झोपली असताना, काहीतरी चावल्याचे तिने वडील धावू बाळू वाख (४८) यांना सांगितले. त्यांनी तिला घेऊन पहाटे साडेतीनच्या सुमारास उपरुग्णालय गाठले. तेथे उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पहाटे ४च्या सुमारास ठाणे येथे जात असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. हे कळताच तिच्या वडिलांना शोक अनावर झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या आईची प्रकृतीही गंभीर झाल्याने पाड्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी एक घटनायाच रात्री या गावातील सोमी शिडू भगत या महिलेलाही सर्पदंश झाला. या महिलेलाही उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.