शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील नाट्यरसिकांच्या नशिबी तीन वर्षांपासून उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:53 IST

नाट्यगृह बंद : दहा कोटींचा निधी मंजूर होऊनही मिळाली नाही दमडी

- नितीन पंडीतभिवंडी : भिवंडी परिसरातील नाट्य रसिकांच्या करमणुकीसाठी महापालिकेने उभारलेले एकमेव नाट्यगृह स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी तो अद्याप महापालिकेस प्राप्त झालेला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी होताच ठाणे, कल्याण येथील नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरू झाले. मात्र, भिवंडीत नाट्यगृह असूनही नाटकांचे प्रयोग होऊ शकत नसल्याने येथील नाट्य रसिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन या नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनास त्याची काहीही चिंता वाटत नसल्याचे नाट्यरसिकांचे म्हणणे आहे. कोरोना संकटाच्या आधी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, निधी मंजूर होऊनही या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. भिवंडी महापालिकेने नागरिकांच्या करमणुकीसाठी १९९५-९६ साली भव्य नाट्यगृह बांधले. राज्यात प्रथमच शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. याच कालावधीत तत्कालीन भिवंडी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता होती. गेल्या २४ वर्षांच्या कालावधीत या नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून, सध्या बंद पडले आहे. भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील नाट्यरसिकांचा त्यामुळे हिरमोड झाला असून, होतकरू व नवकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे. भिवंडीतील रसिकांना नाटक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी कल्याण, ठाणे, मुंबई या ठिकाणी जावे लागत आहे. ही बाब खर्चिक व वेळकाढू असल्याने, अनेकदा भिवंडीतील नाट्यरसिकांना मन मारावे लागते.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, तरी वास्तूची दुरवस्था झाल्याने नाट्यगृह बंद आहे. येत्या ६ जानेवारी रोजी स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी होणार असून, राज्यात शिवसेनेचे ‘ठाकरे सरकार’  सत्तारुढ असताना त्यापूर्वी नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी आहे.नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, त्याचे हस्तांतरण अजूनही भिवंडी महापालिकेकडे झालेले नाही. त्यामुळे नाट्यगृह दुरुस्तीचे सुरू झालेले नाही. या निधीसाठी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. निधी मनपाकडे हस्तांतरित झाल्यावर लागलीच दुरुस्ती करण्यात येईल.    - डॉ. पंकज आशिया,     आयुक्त, भिवंडी महापालिका