शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या माथ्यावरील गावात पाण्यासाठी जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:24 IST

वेटागाव आजपर्यंत दुर्लक्षित : रस्ता नसल्याने करावी लागते टँकरची प्रतीक्षा

जनार्दन भेरे।लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : शहापूर तालुक्यातील वेटापाड्याच्या चारही बाजूंनी उंच डोंगर, दऱ्या असल्यामुळे शहापूर, कसारा, डोळखांब, वासिंद यापैकी कोणत्याच बाजारपेठांशी या पाड्यांचा सहसा संबंध येत नाही. या गावासाठी ना रस्ता ना काही सुविधा. गावासाठी वनविभागाची विहीर बांधली असली, तरी तिला प्यायला घोटभर पाणी नसल्याने पाड्यातील महिलांना थेट दीड किमी खोल दरीत उतरून भातसा धरणातील पाणी आणावे लागत आहे.

शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची तीव्र टंचाई असून या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते आहे. वेटापाडा येथे टँकर सुरू आहे, पण तेथे टँकर येण्याची वाट पाहावी लागते आहे.

शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या आतील विस्थापित झालेले गाव म्हणजेच वेटागाव. भातसा धरणाच्या बांधणीस सुरुवात झाली आणि त्यावेळी धरण क्षेत्रातील घोडेपाऊल, पाचीवरा, पाल्हेरी ही तीन गावे विस्थापित झाली. या गावांतील काही कुटुंबे आपापल्या नातेवाइकांच्या आसºयाला गेली, तर काहींनी आपल्याला जेथे रानावनात जागा मिळेल, तेथे आपले बस्तान ठेवले.

यातीलच एक गाव म्हणजे आजचा वेटा हा पाडा.भातसा धरणातून विस्थापित झालेल्या घरांपैकीच चारपाच घरे धरणाच्या डोंगरमाथ्यावर येऊन आपले बस्तान धरणाच्या उंच अशा टेकडीवर वस्ती केली आहे. आज या पाड्यात तब्बल १९ घरे झाली असून त्यावेळच्या १० ते १२ लोकसंख्येची ९० लोकसंख्या झाली आहे. आज गाव जरी कोठेरा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असला, तरी या पाड्याला सुविधा देणेच कठीण असल्याचे स्वत: गावकरी तुळशी गोमा कैवारी, वसंत पांडुरंग भगत, शंकर राम कैवारी, अनंता वाळकू भगत सांगत आहेत. कोठेरा गावापासून तीनसाडेतीन किमी अंतरावर दºयाखोऱ्यांतून पायवाट करून डोंगराच्या टोकावर हे गाव वसले आहे. या गावात कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने येथे सुविधा मिळणेच अशक्य होऊन बसले आहे.

येथील लोक विटा पाडून आपली घरे बांधत आहेत. येथे चारचाकी वाहनच येत नसल्याने गावाची मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणल्यानंतर मगच दिवसभराचे कामकाज, असा या गावकºयांचा नित्याचा कार्यक्रम आहे. जोपर्यंत घरात पाणी नाही, तोपर्यंत कोणत्याच कामाला सुरुवात होतच नाही. केवळ पाण्यासाठी महिला आणि पुरुष यांचा बराच वेळ जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. 

आता या गावाचे भविष्य बदलणार आहे, ते मुमरी धरणामुळे. या धरणामुळे आता थेट सारंगपुरीमधून मुरबीचापाडा आणि थेट वेटा या रस्त्याने पाणी येथे पोहोचणार आहे. या गावात रस्ताच नाही, त्यामुळे चारचाकी वाहन येथे जात नसतानाही त्यांच्यासाठी विहीर बांधण्यात आली आहे. मात्र, त्यात पाणी नसल्याने त्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते आहे. आम्हाला जितक्या सुविधा देणे शक्य होते, तितक्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.- भाऊ दरोडा, सदस्य, ग्रामपंचायत कोठाराया पाड्याला पाणी पुरवठा करणे शक्य नाही. मात्र, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ठराव आल्यास त्यावर विचार करता येऊ शकेल.- एम. बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग