शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी उपवासाचे स्टफ पॅटीस, साबुदाणा केशर खीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:07 IST

एकादशीसाठी उपाहारगृहांची तयारी : साबुदाणा खीर मिळणार मातीच्या भांड्यांमध्ये, रुचकर थालीपीठाला खवय्यांची पसंती

ठाणे : आषाढी एकादशीनिमित्त उपाहारगृहांत उपवासाच्या पदार्थांची चंगळ दिसून येणार आहे. फळांसोबत साबुदाणा, शेंगदाणे, रताळे आणि खजुरापासून बनवलेले उपवासाचे पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ या म्हणीनुसार उपवासाच्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांसाठी यानिमित्ताने उपवास स्टफ पॅटीस आणि उपवास साबुदाणा केशर खीर हे दोन पदार्थ मेन्यूमध्ये असणार आहे.

आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांचा मोठा उत्सव. या दिवशी भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. परंतु ज्यांना आपल्या कामामुळे पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही, असे भाविक आपापल्या शहरांत एकादशी भक्तिभावाने साजरी करतात. या पार्श्वभूमीवर बाजारपेठदेखील सज्ज झाली असून, फळे, दूध, फुले, उपवासाचे साहित्य यांचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. या दिवशी बहुतांश भाविक उपवास करीत असतात. हल्ली उपवासाचे पदार्थ हे रेडिमेडच आणले जातात. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच पदार्थ घरी बनविले जातात. त्यात साबुदाणा खिचडी, वºयाची खिचडी, साबुदाण्याचे वडे यासारख्या पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे उर्वरित पदार्थ खवय्ये बाहेरूनच आणतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्यानुसार उपाहारगृहांत पदार्थ बनविले जातात. काही पदार्थ हे त्याच दिवशी, तर काही पदार्थ आदल्या दिवशीपासून उपलब्ध करून दिले जातात. यातच एकादशीला थालीपीठ, उपवासाची मिसळ, उपवासाची कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल यासारख्या पदार्थांना अधिक मागणी असते.

उपवासाच्या भाजणीपासून तयार करण्यात आलेल्या रुचकर आणि चविष्ट अशा थालीपीठलाही खवय्ये चांगलीच पसंती देतात. नेहमीप्रमाणे उपवास बटाटावडा, उपवास साबुदाणा बटाटा पुरी, उपवास पुरीभाजी, उपवास थाळी, खरवस, मसाला दूध, पीयूष/लस्सी यासारखे पदार्थ उपलब्ध आहेत. खवय्यांना उपवासाचे नावीण्यपूर्ण पदार्थ मिळावेत, यासाठी उपवास स्टफ पॅटीस आणि गोड पदार्थांत उपवास साबुदाणा केशर खीर बनविण्यात येणार असल्याचे उपाहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले.आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांना चांगली मागणी असते. त्या दिवशीच उपाहारगृहांत येऊन ते पदार्थ खाल्ले जातात, अन्यथा पार्सलही नेतात. आदल्या दिवशी फक्त उपवासाचे ड्राय स्नॅक्सच घेऊन जातात.- केदार जोशी,उपाहारगृहाचे मालक