शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्याला शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: April 28, 2017 00:18 IST

एमएमआरडीएने २०१६-३६ या वीस वर्षांसाठी प्रारूप विकास आराखडा बनवला आहे. आराखड्याला ठिकठिकाणी तीव्र विरोध होत आहे.

मोहोपाडा : एमएमआरडीएने २०१६-३६ या वीस वर्षांसाठी प्रारूप विकास आराखडा बनवला आहे. आराखड्याला ठिकठिकाणी तीव्र विरोध होत आहे. रसायनीनजीकच्या सोमटणे, नारपोली, दापिवली, वावेघर आदी गावे या प्रारूप विकास आराखड्यात समाविष्ट आहेत. आराखड्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी त्याला विरोध करण्यासाठी कंबर कसली आहे. विरोधाची धार तीव्र करण्यासाठी गावागावात बैठकांचे सत्र सुरू आहे. या प्रारूप विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी हरकती नोंदवण्याचे काम सुरू असून या प्रकल्पाला गुळसुंदे जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. यापूर्वी रेल्वेने सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी घेवून प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला दिला नाही. त्यांच्या मुलांना नोकरीत सामावून घेतले नाही. त्यामुळे जमीन जावूनही प्रकल्पग्रस्तांचा विकास झाला नाही. अल्पसा मोबदला देवून प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली. मग आम्ही जमिनी कशाला द्यायच्या, असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे. नारपोली, सोमटणे, दापिवली, वावेघर आदी गावे विकास आराखड्यामुळे बाधित होणार आहेत. एमएमआरडीएने हा विभाग ग्रीन झोन- एक व ग्रीन झोन-दोन म्हणून आरक्षित केला आहे. ग्रीन झोनमध्ये फक्त रासायनिक कारखाने असल्याने येथील निसर्ग संपुष्टात येणार आहे. या विकास आराखड्यात पनवेल तालुक्यातील गावांना कोणताही गावठाण विस्तार दिलेला नाही. त्यामुळे भविष्यात निवाऱ्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.या भागातून १०० ते २०० मीटर रुंदीचे रस्त्यांचे व रेल्वेचे जाळे तयार होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे अनेक गावे विस्थापित होण्याचा धोका आहे. गावठाण हद्दीत किंवा शेतीमध्ये घर बांधायचे असल्यास एमएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. घर बांधण्यासाठी किमान २० गुंठे जागा आवश्यक असल्याचे या प्रारूप विकास आराखड्यात म्हटले आहे. या आराखड्याला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहावे असे आवाहन गुळसुंदे जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील यांनी केले आहे. (वार्ताहर)