शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १३७ कोटींचे पीककर्ज !

By admin | Updated: July 16, 2016 01:39 IST

खरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्जवाटप केल्याचा दावा

सुरेश लोखंडे,  ठाणेखरिपाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना होत असलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत १३७ कोटी २५ लाख रुपयांचे पीककर्जवाटप केल्याचा दावा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने केला आहे. या वर्षी दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रब्बी कर्जापोटी ४५ कोटी, तर खरीप कर्जापोटी १६५ कोटी ८० रुपये वाटप करण्याचे नियोजन टीडीसीसी बँकेने केले आहे. यापैकी २६ हजार २१ शेतकऱ्यांना १३७ कोटी २५ लाखांचे खरीप पीककर्जवाटप केले आहे. २४ हजार ८१० हेक्टर शेतातील पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना हा कर्जपुरवठा केला असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी लोकमतला सांगितले. ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ६०३ शेतकऱ्यांनी त्यांच्या १३ हजार २१९ हेक्टर शेतावरील पिकांच्या उमेदीवर ७४ कोटी ५४ लाख रुपये कर्ज घेतले आहे. तर, पालघर जिल्ह्यातील १० हजार ४१८ शेतकऱ्यांनी ११ हजार ५९० शेतीवर ६२ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनादेखील या पीककर्जाचा लाभ ३० सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे. तर, पंतप्रधान पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत बँकेत अर्ज दाखल करणे अपेक्षित असल्याचे टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना टीडीसीसी बँकेच्या ५९ शाखांद्वारेच पीककर्जाचे वाटप होत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात २९ शाखा असून पालघर जिल्ह्यात ३० शाखा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करीत आहेत. जिल्ह्यातील भात या प्रमुख पिकापोटी हेक्टरी ६० हजार रुपये व नागली पिकाकरिता हेक्टरी ३५ हजार रुपये कर्ज शेतकऱ्यांना दिले जात आहे. यानुसार, या आर्थिक वर्षात रब्बी व खरीप पिकांसाठी ठाणे जिल्ह्यात ९० कोटी ८१ लाख, तर पालघर जिल्ह्यात १२० कोटी रुपये पीककर्जवाटप करण्याचा लक्ष्यांक आहे.