शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: July 7, 2017 06:09 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००० मध्ये केलेल्या पूर्वेतील राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क कोळसेवाडी : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००० मध्ये केलेल्या पूर्वेतील राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २४ ते २५ घरे तोडण्यात आली. त्यात बाधित झालेल्या कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जाईल, असे महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. मात्र, १७ वर्षांत पुनर्वसन न झाल्याने रहिवासी आंदोलनाच्या तयारीत आहेत.२०१३ मध्ये कोळसेवाडी प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक उदय रसाळ यांनी बीएसयूपी योजनेतून बांधलेल्या इमारतींमध्ये या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, असा प्रस्ताव मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर वैजंयती घोलप यांनी मान्यता दिली होती. महापालिकेच्या पुनर्वसन समितीच्या ११ आॅगस्ट २०१४ ला झालेल्या बैठकीत १५ कुटुंबीयांचे कचोरे येथील बीएसयूपी इमारतीत पुनर्वसन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे रहिवाशांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे कागदपत्रे जमा केली. मात्र, अद्याप पुनर्वसन न झाल्याचे रहिवाशांतर्फे त्यांच्या वकील अ‍ॅड. स्वाती गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना २० मार्चला पत्राद्वारे कळवले आहे.महापालिका प्रशासनाने आतापर्यंत विविध कारणे पुढे करून आमचे पुनर्वसन करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे आमची घरे तुटल्यापासून आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत, असे राजेश गायकवाड, सुलोचना कांबळे, माया वाघमारे, प्रतिभा पवार आदी बाधितांनी सांगितले. स्थानिक नगरसेवक सचिन पोटे म्हणाले, २०१४ मध्ये पुनर्वसनाचा ठराव मंजूर झालेला असतानाही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यावर प्रशासनाकडून धोरणात्मक निर्णय लवकरच अपेक्षित आहे. राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक रस्त्यातील बाधितांचे अजूनही पुनर्वसन का झाले नाही, हा एक मोठा प्रश्नच आहे.-राजेंद्र देवळेकर, महापौर, केडीएमसी