शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्यावेळी पोलिसांना बोलावले; मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी कुटुंबाला चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 00:50 IST

कानवे येथील सहा जणांवर सोमवारी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आसनगाव : हळदी समारंभात बाहेरगावचे पाहुणे गावात आल्याने कोरोना वाढेल म्हणून एका नागरिकाने पोलिसांना फोन करून बोलावल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी व नातेवाइकांनी एका कुटुंबाला मारहाण केली. कानवे येथील सहा जणांवर सोमवारी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कानवे गावातील रहिवासी सुरेश  भावार्थे यांच्या मुलीचा हळदीचा ३१ मार्चला कार्यक्रम होता. त्यामुळे पाहुणे आले होते. याबाबत सुदाम भेरे याने किन्हवली पोलीस ठाण्यात कळविले.  सुदाम याने पोलिसांना बोलविल्याचा राग धरत ४ एप्रिलला रात्री सुदामचा मोठा भाऊ अजित हा अंगणात उभा असताना शेजारी राहणारे तुषार भावार्थे, सुरेश आले व त्यांनी अजित याला विचारले, तुझा लहान भाऊ सुदाम याने पोलिसांना कळविले होते ना. तेव्हा अजितने सांगितले की, कोरोनाच्या संसर्गात गावात मंडळी कशाला जमवली म्हणून त्याने फोन केला असेल त्याबाबत मला काही माहीत नाही. त्यावेळी तुषार, सुरेश यांनी अजितला धक्काबुक्की केली. त्याच वेळी गणेश भावार्थे, हरेश पडवळ, अशोक भावार्थे, बबन पडवळ हे सहा जण आले. यातील तुषार याने अजितच्या हातावर रॉड मारून दुखापत केली. सुनील हा अजितला सोडवायला गेला असता गणेश याने सुनीलच्या डोक्यात रॉडने दुखापत केली. इतर कुटुंबीयांनाही मारहाण झाली.