शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

योजनेसाठी सादर केली खोटी कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:56 IST

तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत सुपेगावमधील माजी सरपंच रोहिदास मढवी व सदस्य रोहिणी मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून

भिवंडी : तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत सुपेगावमधील माजी सरपंच रोहिदास मढवी व सदस्य रोहिणी मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक राऊत यांनी जिल्हाधिकाºयांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.शहापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासींच्या सामूहिक विवाहामध्ये कन्यादान योजना राबवली जाते. मढवी दाम्पत्याचे लग्न ३ फेब्रुवारी २००४ मध्ये झाले. त्यांच्या विवाहाची ही नोंद सुपेगाव ग्रामपंचायतीतील रजिस्टरमध्ये केली आहे. तसेच त्यांना नयन व हर्षाली ही दोन मुले आहेत. तरी देखील या दाम्पत्याने कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ मार्च २०१२ मध्ये सामूहिक सोहळ्यात सहभागी होऊन याच दिवशी लग्न झाल्याचे कागदोपत्री सत्यप्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हीट) प्रकल्प अधिकाºयांकडे सादर करून या योजनेमार्फत मिळणारा आर्थिक फायदा घेतला.रोहिदासची बहीण व माजी ग्रामपंचायत सदस्या कलावती मढवी यांचे लग्न पुंडासच्या स्वप्नील भोईर यांच्याशी २००७ मध्ये झाले असून केवळ कन्यादान योजनेचा लाभ घेण्याच्या उद्देशाने त्याची नोंद सुपेगाव ग्रामपंचायत रजिस्टारमध्ये आॅक्टोबर २०११ मध्ये करण्यात आली आहे. तसेच त्यांनी १८ मे २०१२ मध्ये सामूहिक सोहळ्यात सहभागी होऊन या दिवशी लग्न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या दाम्पत्यांनी सत्यप्रतिज्ञापत्रात लिहून दिल्याप्रमाणे दंडनीय कारवाई करावी,अशी मागणी राऊत यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.