शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खोटे दस्तावेज तयार करून वृद्धाची जमीन हडप

By admin | Updated: April 10, 2017 05:34 IST

तलाठी सजा सरळगावमधील एका ९२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची जमीन खोटे दस्तावेज तयार करून

मुरबाड : तालुक्यातील तलाठी सजा सरळगावमधील एका ९२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची जमीन खोटे दस्तावेज तयार करून हडपण्याचा प्रकार यशोदीप सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापक यांनी संगनमताने केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत, न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा मुरबाड पोलिसांनी दाखल केला आहे.तालुक्यातील नागाव येथील ९२ वर्षीय शेतकरी आंबो महादू हरड यांच्या मालकीची दोन एकर जमीन सरळगावच्या हद्दीत आहे. या जमिनीच्या बाजूलाच यशोदीप सामाजिक संस्थेची जमीन आहे. या संस्थेचे संस्थापक, व्यवस्थापक किरण श्रीमंत वायभट आणि गणेश जयराम हरड यांनी संगनमताने हरड यांची दोन एकर जमीन बोगस दस्तावेजाद्वारे संस्थेच्या नावावर करून घेतली. या जमिनीत हरड हरभरा, तूर, मूग अशा कडधान्यांची पेरणी करतात. त्यांची पाहणी करण्यासाठी ते जानेवारी २०१७ मध्ये शेतीकडे गेले असता, त्यांना आपल्या जमिनीला कोणीतरी सिमेंट पोल आणि तारेचे कम्पाउंड कोणीतरी घालत असल्याचे दिसून आले. याबाबत, त्यांनी विचारणा केली असता ही जमीन यशोदीप संस्थेची असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याने लक्षात आल्यावर हरड यांनी तक्रार दाखल केली. पुढील तपास पो.ह. सुभाष जुंदरे करीत आहेत. (वार्ताहर)व्यवस्थापक किरण वायभट व गणेश हरड यांनी ही जमीन संस्थेने विकत घेतल्याचे सांगून व्यवहार झाल्याची कागदपत्रे आंबो हरड यांना दाखवली. हरड यांना तेथे मारहाणही करण्यात आली. आपली जमीन कोणीतरी खोटे दस्तावेज तयार करून संस्थेला विकल्याची खात्री पटल्यावर त्यांनी थेट न्यायालयात दाद मागितली.