शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, चुकीच्या उपचाराने १६ वर्षाच्या तरूणीचा तापाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:56 IST

तापाच्या उपचारासाठी दवाखान्यात चालत गेलेल्या १६ वर्षाच्या मुलीचा ३ तासात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून

उल्हासनगर : तापाच्या उपचारासाठी दवाखान्यात चालत गेलेल्या १६ वर्षाच्या मुलीचा ३ तासात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून समाजसेवक शिवाजी रगडे यांच्यासह नगरसेवक गजानन शेळके यांनी झोपडपट्टीतील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अशा डॉक्टरांना अभय देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापालिकेचे तत्कलिन वैद्यकीय अधिकारी खरात यांनी १५ वर्षापर्वी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली होती. त्यावेळी अनेक डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाल्याने झोपडपट्टीतील अर्ध्या पेक्षा जास्त दवाखाने बंद झाले होते. मात्र कालांतराने पुन्हा असे दवाखाने उघडले असून लहान मुले, वृध्द, महिला, गरीब नागरिक यांच्या जिवाशी हे डॉक्टर खेळत आहेत.धोबी खदान, शास्त्रीनगर येथे राहणारी सिमरन शर्मा हिला ताप येत होता. तिने शेजारील डॉक्टरांकडून तापाचे औषध घेतल्यावर रविवारी २७ आॅगस्टला शर्मा नावाच्या डॉक्टरकडे दुपारी साडे चार वाजता चालत गेली. डॉक्टरने तपासून सलग तीन इंजेक्शन दिली. मात्र तब्येत बिघडल्याने त्रिमूर्ती रूग्णालयात सहा वाजता दाखल केले. त्यांनी इंजेक्शन देऊन सायकांळी ७ वाजता क्रिटी केअर रूग्णालयात नेण्यास सांगितले.क्रिटी केअरमधील डॉक्टरांनी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी सिमरनला तपासून मृत म्हणून जाहीर केले. दुपारी साडे चार वाजता दवाखान्यात चालत जाणाºया मुलीचा ३ तासात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला. बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे मुलीचा जीव गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.सिमरचे वडील संभू शर्मा यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोषी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला. हा प्रकार समाजसेवक शिवाजी रगडे, नगरसेविका कविता रगडे, नगरसेवक गजानन शेळके यांना समजल्यावर त्यांनी शहरातील बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. डॉ. राज रिजाणी कुठलीही कारवाई करत नसून त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल