शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील टोरेंट पावर कंपनीवर जप्ती होण्याची नामुष्की

By admin | Updated: March 7, 2017 22:05 IST

संपूर्ण भिवंडी शहरातील सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या केसेसमध्ये फसवून बदनामी करणाऱ्या टोरेंट पावर कंपनीवर जप्ती होण्याची नामुष्की ओढवली आहे.

भिवंडी : संपूर्ण भिवंडी शहरातील सामान्य नागरिकांना वीज चोरीच्या खोट्या केसेसमध्ये फसवून बदनामी करणाऱ्या टोरेंट पावर कंपनीवर जप्ती होण्याची नामुष्की ओढवली आहे. नुकतेच पालिकेच्या पथकाने टोरेंट पावर कंपनीचे अंजूर फाट्यावरील कार्यालय सील केला आहे. 176 कोटी 50 लाख थकबाकी भरली नसल्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने कारवाई केली.महापौर तुषार चौधरी यांच्या प्रयत्नाने आणि आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार मनपाचे उप-आयुक्त दिपक कुरळेकर, करमुल्यांकन अधिकारी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केलीभिवंडीमध्ये वीज वितरण व वीज बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने गेल्या दहा वर्षांपासून महानगरपालिकेला वापर भाडे कर न दिल्याने भिवंडी पालिकेने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी टोरेंट कंपनीला 176 कोटी 50 लाख 92 हजार 616 रुपये कर भरण्याची नोटीस बजावली होती.टोरेंट कंपनीने पालिकेच्या नोटिसी कडे दुर्लक्ष केल्याने उच्चन्यायालयाच्या निर्देशा नुसार येत्या दोन दिवसात टोरेंट कंपनीवर जप्तीची नोटीस लावून मालमत्ता लिलाव करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे यांनी पत्रकांशी बोलताना सांगितले.26 जानेवारी 2007 ला राज्य शासनाकडून भिवंडी शहराचा वीज वितरण व वीज बिल वसुलीचा ठेका टोरेंट कंपनीला शासनाने दिला आहे. या दहा वर्षाच्या कालावधीत या कंपनीने रस्त्यावरील एसटी ,एलटी पोल ट्रान्स्फार्मर ,जमिनीतून टाकण्यात आलेल्या केबल आदींचे भाडे भिवंडी महापालिकेला आजपर्यंत आदा केलेले नाही. त्यामुळे पालिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे.पालिकेने टोरेंट कंपनीला सन 2007 पासून या संदर्भात वारंवर नोटिसा बजावण्यात आले. तरी कंपनीने पालिकेचा कर भरलेला नाही. त्यामुळे आता भिवंडी पालिकेने टोरेंट कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली.