शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयूपी योजनेत घर मिळवून देण्यासाठी बनावट शिधावाटप पत्रिका; दोघांना अटक 

By धीरज परब | Updated: June 25, 2023 18:09 IST

मोठ्या संख्येने लाखो रुपये उकळून बनावट शिधावाटप पत्रिका सदर दुकानदाराने बनवून दिल्याचा संशय आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या काशीमीरा येथील बीएसयुपी योजनेत घर मिळवून देण्यासाठी बनावट शिधावाटप पत्रीकेसह अन्य बनावट पुरावे बनवून दिल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी सरकारी शिधावाटप दुकानदारासह अन्य दोघांना अटक केली आहे . तर आणखी दोन आरोपी फरार आहेत. मोठ्या संख्येने लाखो रुपये उकळून बनावट शिधावाटप पत्रिका सदर दुकानदाराने बनवून दिल्याचा संशय आहे. योजनेत सर्वेक्षणा पासूनच मोठ्या प्रमाणात घोटाळे - गैरप्रकार असल्याचे आरोप होत आले आहेत. 

मीरा भाईंदर महापालिकेने काशीमीरा डोंगरी येथील जनता नगर व काशी चर्च झोपडपट्टी मध्ये बीएसयुपी योजना राबवली आहे. झोपड्यांच्या जागेवर इमारती उभ्या करून लाभार्थ्यांना पक्की घरे दिली जात आहेत. मात्र सदर योजनेत सदनिका लाटण्यासाठी सर्वेक्षणातीळ गैरप्रकार पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची नावे पालिकेने वगळली देखील आहेत. 

दरम्यान गुरुवार २२ जून रोजी दहिसर येथे राहणारे दयाराम भारती यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी हरिहर चौहान, मंगल मिठाईलाल गांधी, दयाशंकर राजदेव यादव, आशिष नगीना चौहान आणि अमृतलाल पाल ह्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यापैकी हरिहर, मंगल व  दयाशंकर याना अटक केली असून ठाणे न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशिष व अमृतलाल हे फरार झाले आहेत. 

दयाराम यांना बीएसयुपी योजनेत फ्लॅट मिळवून देतो सांगून आरोपींनी २०१५ साली दयाराम यांच्या नावाने बनावट १९९९ सालचा हरिश्चंद्र कोठारी कडून घर खरेदीचा करारनामा व शिधावाटप पत्रिका बनवून दिली. त्या बदल्यात दयाराम यांच्या कडून ७ लाख रुपये घेण्यात आले. काही दिवसानी आशिषने  महापालिकेचा शिक्का असलेले बीएसयूपी योजनेचे झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण गणना पत्रक दिले. घराची मागणी करून देखील आरोपी हे टाळाटाळ करत असल्याने दयाराम यांना संशय आला. त्यांनी शिधावाटप पत्रिका व पालिकेचे गणना पत्रक आदींची पडताळणी केल्या नंतर सदर कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. 

उपनिरीक्षक अमोल जाधव या गुन्ह्याचा तपास करत असून अन्य काही फसले गेलेले लोक देखील समोर येत असल्याने फसवणूक झालेल्यांची संख्या वाढणार आहे. पोलिसांनी दबावाला न जुमानता प्रभावीपणे चौकशी करून कारवाई होणे अपेक्षित असल्याचे फसलेल्या लोकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोड