शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाला सदोष सेवा दिल्याचा फटका

By admin | Updated: July 17, 2017 01:12 IST

सदनिकेची रक्कम देऊनही तिचा ताबा न देता ग्राहकाला सदोष सेवा देणाऱ्या आयोनिक रिअ‍ॅलिटी लिमिटेडसह अन्य दोन भागीदारांना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सदनिकेची रक्कम देऊनही तिचा ताबा न देता ग्राहकाला सदोष सेवा देणाऱ्या आयोनिक रिअ‍ॅलिटी लिमिटेडसह अन्य दोन भागीदारांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने सुमारे ६० हजारांचा दंड सुनावला आहे.मीरा रोड येथील नीतू श्रीवास यांनी मेसर्स आयोनिक रिअ‍ॅलिटी यांच्या वसई येथील नियोजित प्रकल्पात ९ लाख ८५ हजार ५०० रुपयांना सदनिका घेण्याचे ठरले. नीतू यांनी मार्च २०११ मध्ये सदनिकेचे सव्वादोन लाख देऊन सदनिका बुकिंग केली. इमारतीचे बांधकाम २०१४ पर्यंत पूर्ण करून सदनिकेचा ताबा देण्याचे आयोनिक रिअ‍ॅलिटी लिमिटेडच्या वतीने मान्य केले होते. याबाबत, नीतू यांनी अनेकदा विचारणा करूनही त्यांना ताबा दिला नाही. इमारतीचे बांधकामही पूर्ण केले नाही. त्यामुळे नीतू यांनी बिल्डर्सविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. मंचाची नोटीस मिळूनही त्यांनी कोणतीच बाजू मांडली नाही.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता नीतू यांनी आयोनिक इको सिटीमध्ये सदनिका घेण्याचे निश्चित करून सव्वादोन लाख बिल्डर्सला दिले. त्याची पावती मंचात आहे. अ‍ॅलॉटमेंट लेटरमध्येही त्याचा उल्लेख आहे. यावरून आयोनिक रिअ‍ॅलिटीने नीतू यांच्याकडून पैसे घेऊन इमारतीचे बांधकाम केले नाही. सदनिकेचा ताबा दिला नाही किंवा पैसेही परत केले नाही. त्यामुळे त्यांनी सदोष सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले.