भिवंडी : भिवंडी-कल्याण मार्गावरील गोवे गावातील फायबरच्या मूर्तीच्या कारखान्यास गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.गोवे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये ओम साई फायबर नावाने फायबर मूर्ती बनवण्याचा कारखाना होता. त्यामध्ये सजावटीच्या व देवदेवतांच्या मूर्ती बनवून तेथेच विकल्या जात होत्या. कडक उन्हाळा व पत्र्याची शेड यामुळे दुपारी अचानक आग लागली. त्यामध्ये मूर्ती बनवण्याचे साहित्य आणि कारखान्याचा पत्रा जळून खाक झाला .जवळच असलेल्या जितू ढाबाचालकाने कोनगाव पोलिसांना ही घटना कळवल्यानंतर भिवंडी व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी आले. आग दोन तासांत आटोक्यात आली, असे अग्निशमनच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत महेंद्र केणे यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
कारखाना जळून खाक
By admin | Updated: March 31, 2017 06:12 IST