शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

मुंब्य्रात नेत्रहीन तरुणाने दिला डोळसांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:46 IST

स्ट्रीट कार्निव्हल : अमली पदार्थाविरोधात केली जनजागृती, दिव्यांग मित्रांनीही घेतला सहभाग

कुमार बडदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाºया डोळसांनी त्यापासून परावृत्त व्हावे, यासाठी दहावीच्या एका नेत्रहीन तरुणाने स्ट्रीट कार्निव्हलमध्ये जनजागृती केली.

रविवारी मुंब्रा पोलीस ठाणे ते शंकर मंदिरादरम्यान स्ट्रीट कार्निव्हल आयोजित करण्यात आला होता. संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्निव्हलमध्ये अमली पदार्थांच्या सेवनापासून होणाºया दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या क्वीन मेरी हायस्कूल, रफिका हायस्कूल, भारत स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच उम्मीद फाउंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया दिव्यांगांच्या शाळेत दहावीत शिकणाºया शोएब सारंगा या जन्मापासून नेत्रहीन असणाºया तसेच अनेक शस्त्रक्रि यांनंतरही दृष्टी परत न मिळालेल्या विद्यार्थ्यानेदेखील त्याच्या मालदार माहिर, फझल खान, मोहम्मद साद या दिव्यांग मित्रांच्या मदतीने पथनाट्याच्या माध्यमातून दारू तसेच सिगारेटप्रमाणेच गांजा, चरस, एमडी पावडर, गुंगी आणणाºया औषधांच्या सेवनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना सोसाव्या लागणाºया यातनांबाबत जनजागृती केली. कार्निव्हलमध्ये एकूण ६४ शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अमली पदार्र्थांविरोधातील मोहीम सुरूच राहणार असल्याचे ऋता आव्हाड यांनी यावेळी ‘लोकमत’ला सांगितले.

विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडेकार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, निसर्ग वाचवा असा संदेशही दिला. कराटे प्रशिक्षक याकूब खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी स्वरक्षणाचे धडे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले. कार्निव्हलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते, त्यांनी स्टॉलमुळे स्वावलंबनाचे धडे मिळाल्याचे सांगितले.