शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चाळींच्या जमिनीसाठी झाली विशाल तावरेची हत्या?

By admin | Updated: July 17, 2017 01:18 IST

कोळेगावातील न्यू बालाजी दर्शन ही चाळ पाडून ती जमीन एका बिल्डरला देण्यात आली होती. त्यासाठीच चाळीचे पाणी तोडण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोळेगावातील न्यू बालाजी दर्शन ही चाळ पाडून ती जमीन एका बिल्डरला देण्यात आली होती. त्यासाठीच चाळीचे पाणी तोडण्यात आले होते. त्रासलेले चाळीतील रहिवासी शरण येतील आणि मिळेल ती रक्कम घेत घरे सोडतील, असा चाळमाफियांचा प्रयत्न होता. पण पाणी तोडल्याचा जाब विचारल्याने, त्यासाठी वेगवेगळ््या विभागात विशाल तावरेने चकरा मारल्याने बिंग फुटेल या भीतीतून आणि बिल्डरच्या दबावातून ही हत्या झाल्याचे चौकशीतून पुढे येत आहे.पोलिसांसह ज्या ज्या विभागांकडे विशाल यांनी तक्रारी केल्या, त्यांच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात काहीच हालचाल न करण्यामागचे गौडबंगाल काय असाही प्रश्न निर्माण झाला असून त्यातील काहींची या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. विशालने न्यू बालाजी दर्शन चाळीत तीन वर्षापूर्वी खोली घेतली होती. चाळीचा पाणी पुरवठा तोडला आणि तो दीड महिन्यानंतरही सुरळीत होत नसल्याने तो कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे गेला. पण तेथे कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही, अशी माहिती चाळीतील रहिवाशांनी दिली. विशालच्या हत्या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ पाटील याने एका बिल्डरला चाळीची जागा विकसित करण्यासाठी दिली होती. त्यात दोघांनाही निम्मा हिस्सा मिळणार होता. पण चाळकऱ्यांना हिस्सा देण्याची त्यांची तयारी नव्हती. चाळीशेजारीच पाटीलची १५ गुंठे जागा होती. तीही विकसित करायची होती. पण त्यासाठी पोहोच रस्ता बांधण्यात ही चाळ आड येत होती. चाळीतील रहिवाशांची कोंडी केली, तर ते वाटाघाटी करतील, असा त्यांचा अंदाज होता. त्यासाठी पाणी तोडण्यात आले. पण चर्चेसाठी कोणीही पुढे न येता उलट विशाल हा चाळीतील ४८ जणांच्या पाण्यासाठी भांडू लागल्याने त्यांचा प्रयत्न फसला. हत्या झाली त्या रात्री त्याने प्रथम विशालचे चुलते धरमदास व चुलत भाऊ अमितला घरी बोलावून घेतले होते. त्यानंतर एका व्यक्तीची गाडी पाठवून विशालचा आणखी एक भाऊ सुभाष याला बोलावले. तो जाण्यास तयार होत नसल्याने त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. हे कळताच विशाल तेथे गेला. तेथे तोडगा काढण्याऐवजी पाटील यांनी विशालला बेदम मारहाण केली आणि उपचार घेताना विशालचा मृत्यू झाला. मालक नसतानाही या चाळीचे पाणी तोडण्याचा अधिकार पाटील व संबंधितांना कोणी दिला. ते कनेक्शन कोणी कापले आणि तक्रार करूनही पालिका, पोलिसांनी याची दखल का घेतली नाही, याबाबत सारे गप्प आहेत. सुभाषला जबरदस्तीने उचलून नेल्याबद्दल पोलिसांनी अद्याप अपहरणाचा गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्नही त्याने व तावरे कुटुंबियांनी केला.