ठाणे : वडाळा ते कासारवडवली ही मेट्रो गायमुखपर्यंत नेण्याचा विचार एमएमआरडीए करत आहे. कापूरबावडी जंक्शनपासून भिवंडीमार्गे कल्याणला जाणाऱ्या मेट्रोची चाचपणीही सुरू झाली आहे. वडाळा ते ठाणे हा मेट्रोमार्ग घोडबंदर रोडवरील कासारवडवलीपर्यंत आहे. मात्र, ठाणे शहर गायमुखपर्यंत विस्तारलेले आहे. त्यामुळे कासारवडवली ते गायमुख हे आणखी अडीच किलोमीटरचे अंतर मेट्रोने पार करत तिचा विस्तार गायमुखपर्यंत करावा, असा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यानुसार त्यांनी या मार्गाचा पाहणी दौरा केला. (प्रतिनिधी)
ठाणे मेट्रोचा गायमुखपर्यंत विस्तार?
By admin | Updated: January 25, 2017 04:51 IST